शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलाने मारली पाण्यात उडी, आई धावत वाचवायला गेली अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 20:19 IST

एक लहान मुलगा स्विमिंग पुलमध्ये उडी मारताना दिसत आहे (Toddler Jumped in Swimming Pool). मात्र सुदैवाने ही बाब त्याच्या आईच्या लगेचच लक्षात येते आणि ती त्याला वेळीच पाण्यात बुडण्यापासून वाचवताना दिसते.

सोशल मीडियावर दररोज निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिडिओ असे असतात, जे पाहूनच अंगावर काटा उभा राहातो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून यूजर्स हैराण झाले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये (Shocking Video Viral) एक लहान मुलगा स्विमिंग पुलमध्ये उडी मारताना दिसत आहे (Toddler Jumped in Swimming Pool). मात्र सुदैवाने ही बाब त्याच्या आईच्या लगेचच लक्षात येते आणि ती त्याला वेळीच पाण्यात बुडण्यापासून वाचवताना दिसते.

सहसा मुलांकडे आपलं लक्ष नसेल तर ती असे काही उद्योग करतात, ज्यामुळे ते अडचणीत येतात. असंच काहीसं सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा आपल्या आई-वडिलांच्या नजरेत न येता घराच्या मागच्या अंगणात बांधलेल्या स्विमिंग पुलजवळ पोहोचतो. तो यात पोहण्याचा विचार करतो आणि तलावात उडी मारतो.

हा व्हिडिओ पाहून अंदाज लावता येतो की, हा मुलगा वयाने अतिशय लहान आहे. अशा स्थितीत त्याला पोहणं फारसं माहीत नसेल. या गोष्टीची खात्री तेव्हा पटते जेव्हा त्याची आई अचानक वेगाने आपल्या मुलाला हवेतच पकडते आणि त्याला पाण्यात बुडण्यापासून वाचवते. आई ज्या पद्धतीने आपल्या मुलाचा अगदी शेवटच्या क्षणी बचाव करते, ते पाहून तुम्हीही अवाक व्हाल.

व्हायरल होत असलेली क्लिप फिगेन नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. बातमी देईपर्यंत 4 लाख 82 हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 14 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. आईने आपल्या मुलाला पाण्यात बुडण्यापासून वाचवलेल्या सतर्कतेचं सर्वजण कौतुक करत आहेत. व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर