शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

Video - शेवटी आईच 'ती'! ट्रकखाली आला मुलगा, 12 सेकंदात 'तिने' असा जीव वाचवला; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 18:15 IST

Video - एक आई आपल्या मुलाला मोठ्या संकटातून कशी वाचवते हेच व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असतं. त्यांच्यासाठी ती सर्वकाही करते. कितीही संकटं आली तरी ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा करत नाही. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. भयानक अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एक आई आपल्या मुलाला मोठ्या संकटातून कशी वाचवते हेच व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. 

 बाईकवरून जात असताना मुलगा अचानक ट्रक खाली येतो पण त्यानंतर जे काही घडतं त्याला चमत्कारच म्हणता येईल. व्हिएतनाममधील एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलासह बाईकवरून जाताना दिसत आहे. त्यानंतर एक कार त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करते आणि याचदरम्यान कार त्यांच्या बाईकला धडकली. मागे बसलेले आई व मुलगा दोघेही बाईकवरून रस्त्यावर पडले आणि तितक्यात समोरून एक भरधाव ट्रक येत आहे.

मुलगा ट्रकच्या चाकाखाली य़ेणार इतक्यात आई आपल्या मुलाला वाचवते. तिने प्रसंगावधान दाखवून एका हाताने मुलाला उचलले आणि मुलगा ट्रकखाली येण्यापासून वाचला. आईला काहीही होत नाही आणि मुलगादेखील यामुळे वाचतो. हे सर्व फक्त 12 सेकंदात घडतं. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल 49 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांनी आईचे भरभरून कौतुक केलं आहे. तर एका व्यक्तीने तिला 'मदर ऑफ द इयर' म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल