शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पिल्लु खड्ड्यात पडताच बेशुद्ध झाली हत्तीण, बाहेर पडताच पुन्हा उठुन उभी राहिली...पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 18:51 IST

पिल्लाला खड्ड्यात पडताना पाहून हत्तीण बेशुद्ध झाली. पण जसं पिल्लू खड्ड्याबाहेर आलं, तशी ही आईसुद्धा शुद्धीवर आली. व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

आईचा जीव आपल्या पिल्लांमध्ये अडकलेला असतो. फक्त माणसंच नव्हे तर मुक्या जीवांमध्येही अशी ममता दिसून येते. सध्या हत्तीण आई आणि तिच्या पिल्लाचा असाच एक इमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पिल्लाला खड्ड्यात पडताना पाहून हत्तीण बेशुद्ध झाली. पण जसं पिल्लू खड्ड्याबाहेर आलं, तशी ही आईसुद्धा शुद्धीवर आली. व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहणार नाही (Mother Elephant Baby Reunion).

हत्तीण आपल्या पिल्लासोबत जास असताना एका खड्ड्यात तिचं पिल्लू पडलं. त्याच क्षणी त्याची आईही बेशुद्ध झाली. आता आपण आपलं पिल्लू गमावलं, असं तिला वाटू लागलं. त्याच खड्ड्याजवळ बाहेर ती बेशुद्ध झाली. या दोघांच्याही मदतीसाठी रेस्क्यू टीम धावून आली. हत्तीण आणि तिच्या पिल्लाला वाचवण्यासाठी रेस्क्यू टिम अथक प्रयत्न करत होते.

व्हिडीओत पाहू शकता एक हत्तीण बेशुद्ध होऊन पडलेली दिसते आहे. रेस्क्यू टीम तिच्या मदतीसाठी आली आहे. तिला शुद्धीवर आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सीपीआर देऊन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण किती प्रयत्न केले तरी हत्तीण काहीच रिस्पॉन्स देत नाही. तिच्यात काहीच हालचाल होत नाही.  दुसरीकडे तिचा पिल्लू खड्ड्यात पडला आहे. त्यालाही खड्ड्याबाहेर काढण्यासाठी धडपड सुरू आहे. पण खड्ड्यातील माती ओली असल्याने पिल्लू घसरत होतं.

अखेर पिल्लाला खड्ड्याबाहेर काढण्यात यश आलं. पिल्लू खड्ड्याबाहेर येताच ते धावत आपल्या आईकडे गेलं आणि आईला उठवण्याचा प्रयत्न करू लागलं. चमत्कार तर पाहा. जी हत्तीण इतक्या माणसांनी इतके प्रयत्न करूनही उठत नव्हती. ती पिल्लाच्या स्पर्शान आणि आवाजाने लगेच शुद्धीवर आली आणि पिल्लाला आपल्या डोळ्यासमोर सुखरूप पाहताच लगेच उठून उभी राहिली. तेव्हा रेस्क्यू टिमलाही अश्रू आवरले नाही.

आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी रेस्क्यू टीमचंही कौतुक केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर