Viral Video : माकडांना सगळ्यात मस्तीखोर प्राणी म्हटलं जातं. त्यामुळेच त्यांचे मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. ज्यात तो चुकून मिरची खातो. काहीतरी आंबट-गोड असेल म्हणून त्यांनी मिरची तोंडात टाकली आणि त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हीही पोटधरून हसाल.
मिरची खाल्ल्यानंतर लगेच माकडाला समजलं की, त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं झालंय. तो तिखट लागल्यानं इकडे-तिकडे उड्या मारू लागतो. जमिनीवर जीभ घासून त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला लागलेलं तिखट काही कमी होत नाही. हा मजेदार व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओ बघून लोक लोटपोट होऊन बसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोक माकडाच्या मजेदार प्रतिक्रियेवर हसत आहेत. तसेच अनेकांनी कमेंट करून व्हिडीओ गमतीदार असल्याचं म्हटलं तर काहींनी माकडाबाबत चिंता व्यक्ती केली.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर yog_guru_dayananad_verma नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी कमेंट करून असंही म्हटलं की, सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी प्राण्यांसोबत चुकीचं वागलं जात आहे. एकानं लिहिलं की, 'रील्स बनवण्याच्या नादात तुम्ही कुणाला अशी इजा पोहोचवू शकत नाही.