शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् कोंबडीच्या पिलाला वाचवण्यासाठी तो चिमुकला हॉस्पिटलमध्ये पोहोचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 17:30 IST

लहान मुले ही देवा घरची फुले असतात याचा प्रत्यय अनेकदा येतच असतो. लहान मुलंच ही या ग्रहावर सर्वात स्वच्छ मनाची असतात.

लहान मुले ही देवा घरची फुले कशी असतात याचा प्रत्यय अनेकदा येतच असतो. लहान मुलंच ही या ग्रहावर सर्वात निरागस, पवित्र आणि स्वच्छ मनाची असतात. त्यांच्या विचारांमध्ये कोणताही गढूळपणा नसतो, ते फारच सोपा आणि सरळ विचार करतात. असंच काहीसं मिझोरामच्या या चिमुकल्याबाबत म्हणता येईल.

झालं असं की, खेळत असताना चुकून या मुलाची सायकल शेजाऱ्याच्या कोंबडीच्या पिल्लावरून गेली. पण तो तिथून पळून गेला नाही. त्याने त्याच्याकडे असलेले जेवढे पैसे होते ते सोबत घेतले, कोंबडीचं पिल्लू सोबत घेतलं आणि तो जवळच्या हॉस्पिटलमध्ये मदतीसाठी पोहोचला.

एका यूजरने हा फोटो फेसबुकवर शेअर करताच मोठ्या संख्येने शेअर करण्यात आला. ५० हजारांपैक्षा जास्त लोकांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुलाच्या चेहऱ्यावर चिंतेचे हावभाव तुम्ही स्पष्टपणे बघू शकता आणि सोबतच त्याचे हे हावभाव पाहून आपलं हृदयालाही पाझर फुटू शकतो. 

हे कोंबडीचं पिल्लू जिवंत आहे की मेले याबद्दल पोस्टमध्ये काहीही माहिती देण्यात आलेली नाही. पण या मुलाच्या निरागतेचं कौतुक मात्र सोशल मीडियातून भरभरून होत आहे. 

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडिया