शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: वाघाशी मस्ती करत होता इतक्यात पिंजऱ्यात अडकला हात अन् मग जे घडलं धडकी भरवणारं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 13:59 IST

काही लोक असे असतात जे हिंस्र प्राण्यांशीही मस्ती करण्यापासून स्वतःला रोखत नाही आणि याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Tiger video viral). व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल (Man hands stuck in the bars tiger caged).

काही लोक असे असतात ज्यांना मुक्या जीवाला त्रास द्यायला आवडतं. कुत्रा, मांजर अशा प्राण्यांचा छळ ते करतातच पण पिंजऱ्यात बंद असलेल्या हिंस्र प्राण्यांशीही मस्ती करण्यापासून स्वतःला रोखत नाही आणि याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Tiger video viral). व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल (Man hands stuck in the bars tiger caged).

एका तरुणाने चक्क वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकला. शांत बसलेल्या वाघाला तो त्रास देऊ लागला. कधी शेपटी खेच, कधी कान खेच... वाघाला असं त्रास देताना त्या तरुणाचाच हात अचानक त्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर मात्र त्याला चांगलाच घाम फुटला. आपला जीव वाचवण्यासाठी तो धडपडू लागला. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

waleedalqasimi  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडीओत पाहू शकता एका पिंजऱ्यात एक वाघ अगदी शांत बसला आहे. पिंजऱ्याच्या अगदी दरवाजाजवळ तो आहे. एक व्यक्ती या पिंजऱ्याजवळ येते आणि पिंजऱ्यात हात टाकते. वाघाचं तोंड त्या दिशेने आहे, त्याचं लक्ष या व्यक्तीकडे नाही. याचाच फायदा ही व्यक्ती घेते आणि आपली डेअरिंग दाखवायला जाते.

सुरुवातीला ती वाघाच्या शेपटीला हात लावते. त्यानंतर वाघाच्या कानाला स्पर्श करते. वाघ काहीच करत नाही म्हणून ती व्यक्ती पुन्हा पुन्हा वाघाच्या कानाला हात लावत राहते. कानावर माशी बसावी आणि ती उडवावी तसा वाघही कान उडवतो.

त्यानंतर ही व्यक्ती आपला हात पिंजऱ्यातून बाहेर काढायला जाते तेव्हा तिचा हात पिंजऱ्यातच अडकतो आणि त्याची हवा टाईट होते. जीव वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. हात खेचण्याचा प्रयत्न करतो पण हात एकाच फटक्यात बाहेर येत नाही. बऱ्याच वेळाने त्याचा हात पिंजऱ्याबाहेर येतो, तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव येतो आणि पिंजऱ्यापासून तो लगेच दूर जातो.

सुदैवाने वाघ शिकारीच्या मूडमध्ये नाही, त्याचं पोट भरलेलं असावं म्हणून तो शांत बसला आहे. त्यामुळे ही व्यक्ती वाचली. जर वाघ चवताळला असता आणि त्याची नजर या व्यक्तीवर पडली असती तर काही खरं नव्हतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम