शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

Shocking! उकळत्या तेलात हात घालून काढली गरम भजी आणि पेपरवर टाकुन दिली ग्राहकाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 20:05 IST

एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर... साहजिकच फक्त सांगून यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र सध्या असा एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

गरमागरम भजी, वडा प्रत्येकाला आवडतो. पण हे पदार्थ बनवता तेलातून निघणारी वाफही सहन होत नाही. तेलाचा एक थेंब जरी अंगावर उडाला तरी किती चटका लागतो तुम्हाला माहिती असेल. मग विचार करा, जर एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर... साहजिकच फक्त सांगून यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र सध्या असा एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Man taking out pakoda from boiling hot oil by hand).

एक व्यक्ती चक्क हाताने तेलात भजी तळतो आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती दाल पकोडा विकतो आहे. त्याच्यासमोर भलीमोठी कढई आहेत. त्यात भजी टाकलेल्या आहेत. तेलातून बुडबुडे येत आहेत, वाफा येत आहेत. त्यावरूनच तेल किती गरम आहे हे दिसून येतं. उकळतं तेल पाहून आपल्या अंगावरच काटा येतो.

इतक्यात एक ग्राहक येतो आणि ही व्यक्ती त्या ग्राहकाला भजी देण्यासाठी हातात एक कागद घेते. आता कढईतील गरमागरम भजी त्याला द्यायची आहे, त्यासाठी तो त्या चमच्याने काढणं अपेक्षित होतं. पण ही व्यक्ती थेट आपला हातच त्या उकळतं तेल असलेल्या कढईत टाकते. हातांनी काही भजी तेलातून बाहेर काढते आणि कागदावर ठेवते.

हरीश गोस्वामी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ छत्तीसगडच्या रायपूरजवळील आहे. इथल्या बस स्टँडवरील हा दाल पकोडा विक्रेता आहे. हा विक्रेता इतक्या सहजरित्या तेलात हात टाकून भजी काढतो जणू काही त्याच्यासाठी ते उकळतं तेल नव्हे तर साधं पाणीच आहे. त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही. गरम तेलात हात टाकताना काय काळजी घ्यायला हवी ही टेक्निक या व्यक्तीला माहिती असावी. ही व्यक्ती आपल्या या कौशल्यात किती पारंगत झाली आहे हेच यावरून समजतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम