पेट्रोलच्या 'सेंच्युरी'नंतर बॅट अन् हेल्मेट उंचावणारा 'तो' आहे तरी कोण? एका व्हायरल फोटोची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 08:46 AM2021-02-16T08:46:15+5:302021-02-16T08:49:57+5:30

Petrol Diesel Prices: भोपाळमध्ये पेट्रोल शंभरी पार गेल्यानंतर एकानं पेट्रोल पंप हेल्मेट आणि बॅट उंचावली. या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Man Poses With A Bat and Helmet At Petrol Bunk As Fuel Prices Hit Century Mark | पेट्रोलच्या 'सेंच्युरी'नंतर बॅट अन् हेल्मेट उंचावणारा 'तो' आहे तरी कोण? एका व्हायरल फोटोची गोष्ट

पेट्रोलच्या 'सेंच्युरी'नंतर बॅट अन् हेल्मेट उंचावणारा 'तो' आहे तरी कोण? एका व्हायरल फोटोची गोष्ट

Next

भोपाळ: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभरी ओलांडेल. भोपाळमध्ये शनिवारी पेट्रोलच्या दरानं शंभरी ओलांडली. याची माहिती पेट्रोल पंपांना रात्री ३ वाजता मिळाली. त्यामुळे पहाटेपासून पेट्रोलसाठी भोपाळवासीयांना शंभर रुपये मोजावे लागले. अर्थात हा दर प्रीमियम पेट्रोलचा आहे. (Fuel Prices Hit Century Mark In Bhopal)

काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक

पेट्रोलनं शतक झळकावताच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती पेट्रोल पंपवर बॅट आणि हेल्मेट उंचावून दाखवत आहे. क्रिकेटमध्ये शतक झळकावल्यानंतर खेळाडू बॅट आणि हेल्मेट उंचावतात. त्याचप्रमाणे ही व्यक्ती पेट्रोलच्या दरानं शतक गाठल्यानंतर बॅट आणि हेल्मेट उंचावून दाखवत आहे. फोटोतील व्यक्ती युथ काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. 



माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार

पेट्रोल पंपवर बॅट आणि हेल्मेट उंचावून दाखवणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. 'बऱ्याच अथक प्रयत्नांनंतर आणि कष्टानंतर अखेर पेट्रोलनं शतक साकार केलं आहे' अशी कमेंट एकानं केली आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीनं 'चाहते एका वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून विराट कोहलीच्या शतकाची वाट पाहत आहेत. पण हा मैलाचा दगड आधी कोणी गाठला पाहा,' अशी भन्नाट प्रतिक्रिया दुसऱ्या व्यक्तीनं दिली आहे.

भोपाळमध्ये पेट्रोलनं तिहेरी आकडा गाठताच शहरातील काही पेट्रोल पंप बंद करण्यात आले. या पेट्रोल पंपवरील यंत्रणा शंभर आणि त्याच्यापुढील दरांसाठी सज्ज नव्हती. त्यामुळेच पेट्रोलनं शंभरी गाठताच हे पेट्रोल पंप बंद करण्यात आले. मात्र अशा पेट्रोल पंपांची संख्या अतिशय कमी आहे. या ठिकाणची यंत्रणा लवकरच अपडेट केली जाईल, अशी माहिती पंप मालक संघटनेचे अध्यक्ष अजय सिंह यांनी दिली.

Web Title: Man Poses With A Bat and Helmet At Petrol Bunk As Fuel Prices Hit Century Mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.