शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

Viral Video: हिंस्त्र तरसाच्या पिंजऱ्यात घुसला माणूस अन् मग, पुढे जे झालं ते होतं केवळ धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:51 IST

प्राणी समोर दिसले तरी या प्राण्यांच्या अगदी जवळ जाण्याची हिंमत मात्र आपली होत नाही. पण काही लोक असे असतात जे नको ती डेअरिंग करतात. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणी पाहायला कुणाला आवडत नाही. त्यासाठी आपण मुद्दामहून जंगल सफारी, नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहायलयात जातो. असे प्राणी समोर दिसले तरी या प्राण्यांच्या अगदी जवळ जाण्याची हिंमत मात्र आपली होत नाही. पण काही लोक असे असतात जे नको ती डेअरिंग करतात. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एक तरुण खतरनाक प्राण्याच्या पिंजऱ्यात घुसला आहे. हा प्राणी म्हणजे तरस आहे. जो एक जंगली प्राणी आहे. इतर वन्य प्राण्यांप्रमाणेत तोसुद्धा माणसांवर हल्ला करतो. अशाच प्राण्याच्या पिंजऱ्यात घुसून हा तरुण बिनधास्तपणे तिथेच बसून राहिला (Man playing with hyena in cage). हे फक्त वाचूनच तुम्हाला धडकी भरली असेल. पण पुढे जे घडलं ते यापेक्षाही धक्कादायक आहे. हा व्हिडीओ तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला तरुण एका पिंजऱ्यात बसलेला दिसतो. तो कुणालातरी हातवारे करून आपल्याकडे बोलावते. इतक्या एक भयानक प्राणी त्याच्याकडे धावत येतो. हा प्राणी तरस आहे.

तरस जवळ येताच व्यक्ती आपले दोन्ही हात मागे घेते आणि मान खाली घालते. तरस त्या व्यक्तीच्या हात तोंडात धरण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या खांद्यालाही तो चावताना दिसतो. त्यानंतर त्याच्या चेहऱ्याजवळही तो चाटताना दिसतो आणि मग त्या व्यक्तीच्या मांडीवर लोळण घेतो. व्हिडीओ पाहून आपल्याला धडकी भरते. पण या व्यक्तीला त्याची बिलकुल भीती वाटत नाही आहे. तरसही त्या व्यक्तीला तशी दुखापत करताना दिसत नाही.

पण काही असलं तरी शेवटी तो हिंस्र प्राणी. त्यामुळे तुम्ही हा व्हिडीओ पाहून असं कोणत्याही प्राण्यासोबत करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अशा ठिकाणी फिरायला गेलात तर सावध राहा. प्राणी कितीही क्युट , शांत वाटले तरी अशा प्राण्यांसमोर जाण्याची हिंमत बिलकुल करू नका.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम