शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

Viral Video: बाबो! विशालकाय विषारी कोब्राला किस करायला गेला, पण...डाव त्याच्यावरच उलटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:26 IST

काहीजण मात्र सापाला फक्त हातात पकडत नाहीत तर या अत्यंत विषारी प्राण्यावर प्रेमही करतात (Man Kissing Snake Video). असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्यक्ती सापाला हातात धरून त्याला किस करताना दिसत आहे (Amazing Video).

जगातल्या सगळ्यांत धोकादायक प्राण्यांमध्ये सापाचा समावेश होतो (Dangerous Snake Video). कुठे सरपटणारा साप दिसला तरी माणसाचा भीतीनं थरकाप उडतो. त्याच्या समोर जाऊन त्याला पकडण्याची हिंमत खूपच कमी जण दाखवतात. काहीजण मात्र सापाला फक्त हातात पकडत नाहीत तर या अत्यंत विषारी प्राण्यावर प्रेमही करतात (Man Kissing Snake Video). असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्यक्ती सापाला हातात धरून त्याला किस करताना दिसत आहे (Amazing Video).

सापाचे व्हिडिओ आणि कंटेट सोशल मीडियावर भरपूर लोकप्रिय (Daring Video on Social Media) आहे. विशेषत: सापासारखा विषारी प्राणी जर एखादी व्यक्ती आपल्या तोंडाजवळ आणत असेल किंवा त्याचा मुका घेत असेल तर अर्थातच ते बघणाऱ्यांच्या अंगावरही शहारे उभे राहतात. नुकताच एका महिलेनं आपल्या चेहऱ्याजवळ एक दोन तोंडं असलेला साप आणला, हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला होता. आता एका व्यक्तीनं कोब्रा सापाचा किस घेतल्याचा व्हिडिओ (Man kissing cobra video) व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतील व्यक्तीचं नाव आहे ब्रायन बार्कजिक (Braian Barczyk). तो व्यवसायानं एक व्हिडिओ क्रिएटर आहे. त्याला साप आणि अन्य प्राण्यांबरोबर खेळण्याचा आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवण्याचा छंद आहे. या छंदामुळेच एक भल्यामोठ्या आणि विषारी सापाचा किस घेण्याचं चॅलेंज ब्रायननं स्वीकारलं. जेव्हा सुरुवातीला ब्रायननं साप हातात घेऊन त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा साप आधी भडकला. मात्र, ब्रायन प्रेमानं जवळ घेत असल्याचं आणि त्याच्यापासून काहीही धोका नसल्याचं कदाचित सापाला नंतर जाणवलं असेल. त्यामुळे सापानं नंतर काहीही विरोध केला नाही उलट ब्रायनला त्यानं जवळ येऊ दिलं.

हा व्हिडिओ ब्रायननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट snakebytestv वरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर १४ तासांच्या आतच १० हजारांपेक्षा जास्त लोकांना तो आवडला आहे. त्यावर लोकांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सापाचा किस घेणारी व्यक्ती प्रचंड शूर आणि चांगली असल्याचं काही जणांनी म्हटलं आहे. पण काहीजणांनी मात्र त्याला फक्त स्टंट म्हटलंय. सुरक्षेबाबतही काहीजणांनी काळजी व्यक्त केली आहे. तर ब्रायननं घेतलेला पहिला किस सापाला आवडला नाही, अशी मजेशीर प्रतिक्रियाही काहीजणांनी दिली आहे.

ब्रायननं हा स्टंट केला; पण त्याला त्याची सवय होती. अर्थातच त्यामध्ये भरपूर धोकाही होता. पण केवळ प्रसिद्धीसाठी कोणताही विचार न करता अशा प्रकारचे व्हिडिओ कृपया तुम्ही तयार करू नका.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम