शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: खतरनाक! मगरींनी भरलेल्या पाण्यात उडी टाकली या पठ्ठ्यानं, अन् मग जे झालं ते होतं भयानक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 13:30 IST

एखादी व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून स्टंट करण्याचा प्रयत्न करते. हे व्हिडिओ (Stunt Video) पाहून सर्वसामान्य लोक थक्क होतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

जर तुम्ही इंटरनेटच्या दुनियेत सक्रिय राहात असाल तर दररोज तुम्हाला इथे नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये अनेक व्हिडिओ हास्यास्पद असतात तर अनेक व्हिडिओ पाहून आपल्याला आश्‍चर्यही वाटतं. अनेकदा असे व्हिडिओही पाहायला मिळतात, ज्यात एखादी व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून स्टंट करण्याचा प्रयत्न करते. हे व्हिडिओ (Stunt Video) पाहून सर्वसामान्य लोक थक्क होतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल आणि कोणीही हेच म्हणेल, की हा व्यक्ती खरंच 'खतरों का खिलाड़ी' आहे. पृथ्वीवर विविध प्रकारचे आणि धोकादायक प्राणी राहतात, त्यातीलच एक आहे मगर. तिचं खडबडीत आणि काटेरी शरीर पाहूनच अंगावर काटा येतो. ज्याप्रमाणे सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटलं जातं, त्याचप्रमाणे मगरीला 'समुद्राचा सिकंदर' म्हटलं जातं. माणूस असो वा प्राणी, सगळेच नेहमी या दोघांपासून दूर राहतात. पाण्यात मगरीसोबत पंगा घेणं, म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. तरीही काही लोक या धोकादायक शिकाऱ्याच्या जवळ जातातच. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ (Crocodiel Video) समोर आला आहे. हा व्यक्ती स्वतःच मगरींनी भरलेल्या तलावात जातो.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की तलावात अनेक भुकेल्या मगरी दिसत आहेत. अशा परिस्थितीत एक व्यक्ती न घाबरता त्या तलावात उडी मारतो आणि मगरी वेगाने या व्यक्तीच्या दिशेने येऊ लागतात. मात्र हा व्यक्ती मगरीला हाताने उचलून दुसऱ्या बाजूला फेकतो. त्याच्याकडे बघून तो मगरींबरोबर खेळायला गेला असावा असं वाटतं!

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक थक्क झाले असून कमेंट्समधून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, 'भाऊ, या व्यक्तीला नक्की आत्महत्या करायची आहे, कारण तो भुकेल्या मगरींजवळ गेला आहे. त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिलं, 'ये है रिअल लाइफ का खतरों का खिलाडी.' आणखी एका यूजरने लिहिलं, 'तो आपला जीव धोक्यात घालून मगरींसोबत आनंद कसा घेऊ शकतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘memewalanews’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम