शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! गाय अन् वासराला पाणीपुरी खाताना पाहिलंत का?; तुफान व्हायरल होणाऱ्या Video नं जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 09:56 IST

Man Feeds Golgappas To Cow And Its Calf Viral Video : एका काकांनी गायीला आणि वासराला पाणीपुरी खायला दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून नेटिझन्सच्या पसंतीस उतरला आहे. 

नवी दिल्ली - सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन ट्रेंड्स येत असतात. अनेक गोष्टी या पटकन व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. पाणीपुरी ही सर्वांच्याच आवडीची. नुसतं नाव काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आपण ती नेहमीच खातो. पण तुम्हाला जर कोणी गाय आणि वासऱ्याने पाणीपुरी खाल्ल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो, हे खरं आहे. एका काकांनी गायीला आणि वासराला चक्क पाणीपुरी खायला दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून नेटिझन्सच्या पसंतीस उतरला आहे. 

गायीला आणि वासराला पाणीपुरी देणाऱ्या या काकांचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. एका इन्स्टाग्राम युजरने आपल्या अकाऊटंवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच 'खूपच गोड' (टू क्यूट) असं कॅप्शन देखील दिलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सुपरहिट झाला असून आतापर्यंत 57 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहे. तर काही युजर्सनी गायीला पाणीपुरी देणाऱ्या काकांना रियल हिरो असं देखील म्हटलं आहे. याआधीही हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

सोशल मीडियावर खूप व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाणीपुरीच्या स्टॉलजवळ असून गाय आणि वासराला पाणीपुरी खायला देत आहे. गाय आणि वासरू दोघंही शांतपणे आपल्या नंबरची वाट पाहत पाणीपुरी खाताना दिसत आहेत. काही लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. आपण नेहमीच पाणीपुरी आवडीने खातो पण गायीला आणि वासराला पाणीपुरी खाताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाcowगाय