शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: साबण कचाकचा चावून खातोय हा माणूस, कारण काय? तर म्हणे...अंदर की खुबसुरती निखारनी है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:31 IST

त्वचेवर हा साबण लावल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात, त्वचा उजळते, मुलायम होते. पण एका तरुणाने तर सुंदर दिसण्याच्या नादात चक्क साबणच कचाकचा चावून खाल्ला आहे.

आपण सुंदर दिसावं असं कुणाला वाटत नाही. फक्त तरुणीच नाही तर तरुणांनाही असं वाटतं. सुंदर दिसण्यासाठी लोक काय काय नाही करत. वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्स, ट्रिटमेंट, थेरेपी घेतल्या जातात. काही साबणामुळेही सौंदर्य टिकवता किंवा खुलवता येतं, अशा दावा करणाऱ्या जाहिरातीही केल्या जातात. त्वचेवर हा साबण लावल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात, त्वचा उजळते, मुलायम होते. पण एका तरुणाने तर सुंदर दिसण्याच्या नादात चक्क साबणच कचाकचा चावून खाल्ला आहे (Man eating soap video).

सौंदर्य खुलवण्यासाठी फक्त बाह्य उपाय करून फायदा नाही. शरीराच्या आतीलही सौंदर्य महत्त्वाचं असतं. यासाठी योग्य आहार, व्यायाम गरजेचा असतो. पण या तरुणाने मात्र शरीराच्या आतील सौंदर्याचा कदाचित वेगळाच अर्थ घेतला. बाह्य सौंदर्य खुलवण्यासाठी वापरला जाणारा साबण त्याने चक्क खाल्ला. साबण खाणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता तरुणाच्या समोर बरेच साबण आहेत. साबणाच्या बॉक्समधील तो साबण काढतो आणि खातो. गाजर, मुळा खावा तसा तो साबण कचाकचा चावून खातो. साबणासोबत बाजूला स्पंज आहे, ज्यावर साबणाचा फेस आहे. हा तरुण मध्येच तो फेस ज्युस, पाणी प्यावं तसं पिताना दिसतो.

फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतून सुंदर होण्याचा प्रयत्न असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका युझरने सुंदर दिसण्याच्या नादात हा रुग्णालयात नक्की जाईल असं म्हटलं आहे. एका युझरने ही व्यक्ती जिवंत आहे का? अशीही विचारणा केली आहे.

साबणात बरेच केमिकल्स असतात. त्यामुळे साबण खाण्याचं तरुणाचं हे कृत्य खतरनाक आहे. त्यामुळे तुम्ही असं काही करू नका, असं आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक