शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: ढोल वाजताच अंगात वारं भरलं याच्या, असा नाचू लागला की लोक म्हणाले अरे याला आवरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:32 IST

सध्या सोशल मीडियावर अशा तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्याचा डान्स पाहून याला आवरा असंच तुम्हीही म्हणाल.

 लागल्यावर, ढोलताशा वाजल्यावर आपलं शरीर थिरकत नाही असं होतच नाही. डान्स येवो न येवो पण ढोलताशाचा आवाज कानावर पडताच अंगात जणू संचारतंच. बाकी कोणता प्रोफेशनल डान्स नाही आला तरी नागिण आणि गणपती डान्स तर प्रत्येकाला हमखास येतोच येतो. पण सध्या सोशल मीडियावर अशा तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्याचा डान्स पाहून याला आवरा असंच तुम्हीही म्हणाल.

ढोलचा आवाज ऐकून तरुणाला अचानक काय झालं कुणास ठाऊक तो विचित्र वागू लागला. भररस्त्यात त्याने असं काही केलं की तिथं त्याला पाहणारे सर्वजण शॉक झाले आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल पण हसूही आवरणार नाही. (Man Dancing Madly on Dhol) अगदी पोट धरून पोट दुखेपर्यंत तुम्ही हसाल (Funny Dance Video) .

व्हिडीओत पाहू शकता रस्त्यात काही ढोलवाले ढोल वाजवत आहेत. त्यांच्या आजूबाजूला काही लोक उभे आहेत. अचानक एक तरुण तिथे येतो. तो धाडकन जमिनीवर एका ढोलवाल्याच्या पायाजवळ पडतो. त्याला पाहून सर्वजण घाबरतात. ढोलवालेही बाजूला होता. इतर लोकही दूर जातात.

त्यानंतर काही लोक पुढे येतात आणि त्या तरुणाला जमिनीवरून उचलतात. त्याला उभं करतात. पण तरुण कुणालाचा ऐकत नाही. तो कुणाला आवरतही नाही. तो वेड्यासारखा नाचत राहतो. शेवटी एक व्यक्ती त्याच्या कमरेभोवती हात गुंडाळून त्याला घट्ट धरून उभी राहते. तरी हा तरुण नाचताना दिसतो. जे पाहून सर्वजण हैराण होतात.

तसं डान्स करायला अनेकांना आवडतं. पण असा डान्स तुम्ही कधी पाहिला नसेल आणि असा डान्स कुणाला करायलाही आवडणार नाही. memecentral.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. असा डान्स करायचा आहे तर माझ्या लग्नात येऊ नका, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर यावर कमेंट करताना एका युझरने लग्नात अशाच मित्रांना बोलवायला हवं असं म्हटलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य