एका प्रसिद्ध मलेशियन गायिकेने केलेल्या कृत्याची चर्चा सध्या संपूर्ण जगभरामध्ये होत आहे. मागील आठवड्यात पोलिंसानी या मलेशियन गायिकेला अटक केली. पण ज्या कारणामुळे अटक झाली ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल... या गायिकेने आपल्या घरात एका जंगली अस्वलाला पाळले होते. यावर त्या गायिकेचं म्हणणं आहे की, तिला वाटलं ते अस्वल नसून कदाचित कुत्र्याचं पिल्लू होतं. त्यामुळे ती त्या अस्वलाला घरी घेऊन आली. Asia One ने दिलेल्या वृत्तानुसार, जरिथ सोफिया यसीन या मलेशियातील प्रसिद्ध गायिकेने दावा केला आहे की, तिला हे अस्वल दोन आठवड्यांपूर्वी भेटले होते. त्यावेळी तिला फार आजारी दिसत असल्यामुळे तिने त्याला आपल्यासोबत घरी आणले होते. 

Kosmoसोबत बोलताना गायिकेने सांगितले की, 'रात्रीच्या वेळी मला अस्वलाचं पिल्लू रस्त्याच्या बाजूला दिसलं. मला त्यावेळी वाटलं की, हे कुत्र्याचं पिल्लू आहे.' रिअॅलिटी शो रोकानोवामधील कंटेस्टेंट असलेल्या गायिकेने The Star या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 'कायद्याच्या विरोधात जाण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.'

या प्रकरणासंदर्भात गायिकेने सांगितले की, 'मला माहित आहे, अस्वलाला पाळणं हे कायद्याच्या विरोधात असून मी त्याला एखाद्या पाळी प्राण्याप्रमाणे ठेवू शकत नाही. मला फक्त त्या आजारी अस्वलाची मदत करण्याची इच्छा होती. माझं त्या अस्वलाचं शोषणं करण्याचा हेतू नव्हता.' तसेच तिने बोलताना सांगितले की, जेव्हा अस्वल बरं होणार होतं त्यावेळी ती स्वतः त्याला प्राणीसंग्रहालयाकडे सोपवणार होती. एवडचं नाही तर या गायिकेने त्या अस्वलाचं भ्रूनो असं नावही ठेवलं होतं 

गायिकेने पुडे बोलताना सांगितले की, 'मी घरी गेले होते. मला त्याला उपाशी ठेवायचे नव्हते. मी त्याला खाण्यासाठी काही पदार्थ ठेवले होते. मला भ्रुनोला प्राणीसंग्रहालयामध्ये पाठवायला फार भिती वाटत होती. कारण तेथील प्राणी फार कमजोर असतात. 

पाहा व्हिडिओ : 

सोशल मीडियावर एक व्हि़डीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक अस्वल खिडकीतून बाहेर डोकावून ओरडताना दिसत आहे. जे पाहून अनेक लोक घाबरले होते. त्यानंतर त्यांनी मलेशिया विभागातील वन्यजीव डिपार्टमेंटने छापा घालून अस्वलाला ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर या गायिकेला अनेक लोकांनी खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान, गायिकेवर अवैध्य पद्धतीने विकण्यासाठी ठेवल्याचा आरोप लावण्यात आला असून गायिकेने आपल्यावरील हा आरोप खोटा असल्याचे सांगितले आहे.  


Web Title: Malaysian singer with sun bear in condominium home charged
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.