शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

टीबीच्या रुग्णाला आणा मिळवा सोन्याच्या नाण्यांसह रोख बक्षीस, रूग्णालयाची अनोखी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 16:47 IST

दिवाळीचा सण अगदी काही दिवसांतच येणार आहे, त्यामुळे सर्वत्र ऑफर्स पाहायला मिळत आहेत.

नवी दिल्ली : दिवाळीचा सण अगदी काही दिवसांतच येणार आहे, त्यामुळे सर्वत्र ऑफर्स पाहायला मिळत आहेत. ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी बाजारपेठेतील सर्व दुकानांमध्ये एकापेक्षा एक ऑफर्स आणण्यात आल्या आहेत. काही दुकानदारांनी किंमतींमध्ये मोठी सवलत दिली आहे तर काहींनी एका वस्तूवर दुसरी वस्तू विनामूल्य देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. दिवाळीच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. त्यामुळे छोट्या दुकानांपासून ते मोठ्या शोरूमपर्यंत सगळीकडे धमाकेदार ऑफर्सचे पोस्टर्स लागलेले असतात. मात्र सध्या एका अनोख्या ऑफरची खूप चर्चा रंगली आहे. या ऑफरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी याचे कौतुक करत आहेत. 

सोशल मीडियावर रूग्णालयाने दिवाळी ऑफर दिल्याचा फोटो व्हायरल होत आहे. या रूग्णालयाने दिलेली दिवाळी ऑफर अनोखी असल्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधत आहे. टीबी अर्थात क्षयरोगाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णालयाने ही दिवाळी ऑफर दिली आहे. ऑफरच्या पोस्टरवर लिहिले आहे, 'टीबीचा नवीन रूग्ण घेऊन या आणि बक्षीस मिळवा' ही दिवाळी बक्षीस योजना 'राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम' अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या दिवाळी ऑफरमध्ये 500 ते 50,000 रुपयांपर्यंतच्या बक्षिसांचा समावेश आहे. खरं तर ही ऑफर 24 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर दरम्यान लागू असणार आहे. 

रूग्णालयाच्या ऑफरने वेधले लक्ष  मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात आरोग्य विभागाने टीबी रुग्णांना जागरूक करण्यासाठी आणि क्षयरोगाचा सामना करण्यासाठी ही योजना चालवली आहे. या योजनेच्या माध्यमातून रूग्णांच्या संख्येच्या आधारे लोकांना बक्षीस दिले जात आहे. जर एका व्यक्तीने एका रुग्णाला आणले तर त्याला 500 रुपये किंवा टिफिन, 5 रुग्णांसाठी 2,500 रुपये किंवा मिक्सर, 10 रुग्णांसाठी 5,000 रुपये किंवा मोबाईल फोन, त्याचप्रमाणे 100 रुग्ण आणणाऱ्या व्यक्तीला 50,000 रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले जाणार आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलDiwaliदिवाळी 2022