Lucknow Video:सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण-तरुणी दुचाकीवरुन जात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, धावत्या दुचाकीवर तरुणी गाडी चालवणाऱ्या तरुणाला चप्पलने मारहाण करताना दिसलेय. एकदा उजव्या गालावर तर एकदा डाव्या गालावर....अशा पद्धतीने 14-15 वेळा चपलीने झोडपून काढते.
तुम्हाला वाटत असेल तरुणी मस्करीत मारतेय, पण तसे नाही. व्हिडिओमध्ये तरुणी रागाच्या भरात तरुणाला चप्पलने मारल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तरुणा चप्पल मारत राहते अन् तो बिचारा तरुण काहीही न करता गपचुप बाईक चालवत राहतो. हा व्हिडिओ एका पाठीमागून येणाऱ्या व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर अपलोड केला. 20 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये तरुणाला 14-15 वेळा चप्पलने मारहाण करताना दिसते.
या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोकांना ही घटना मजेशीर वाटतेय, तर काहींनी त्या तरुणीच्या वर्तनाचा निषेध केला आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. लखनऊ पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेतली असून, खुर्रम नगर पोलिस ठाण्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुण आणि तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.