शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Viral Video: सिंहाच्या कळपनाने वासरावर चढवला हल्ला, आई आली धावत अन् स्वत: शिकार झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:05 IST

एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात आपल्या पिल्लाचा जीव वाचावा म्हणून आई स्वतःहून सिंहांची शिकार झाली.

माणूस असो वा मुका जीव. एकमेकांपेक्षा वेगळे असले तरी त्यांची ममता, आईचं प्रेम मात्र सारखंच असतं. आपल्या पोटच्या गोळ्यावर संकट आलं की मग आई आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. वेळप्रसंगी आपल्या जीव देते, हसत हसत मृत्यूला कवटाळते पण आपल्या मुलांवर, पिल्लांवर साधं खरचटूही देत नाही. अशाच आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात आपल्या पिल्लाचा जीव वाचावा म्हणून आई स्वतःहून सिंहांची शिकार झाली (Lion attack on buffalo).

सिंह आणि म्हशीचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सिंहाच्या तावडीतून निसटलेली म्हैस आपल्या वासराला वाचवण्यासाठी पुन्हा सिंहाच्या कळपात आली. आपल्या वासराचा जीव वाचावा म्हणून तिने स्वतःहून सिंहांच्या जबड्यात गेली. पण शेवटी जे घडलं ते हादरवाणारं आहे.

व्हिडीओत पाहू शकता म्हैस आपल्या वासरासह जंगलात फिरताना दिसते आहे. इतक्या सिंहांचा कळप येतो. त्यावेळी म्हशीचं वासरू घाबरून पळू लागतं. पिल्लाचा जीव वाचावा म्हणून म्हैस थोडावेळी तिथेच थांबते. आई आपल्यासोबत नाही हे पाहून वासरू सैरवैर होतं. ते पुन्हा आपल्या आईकडे येतं. वासरू जवळ येताच आई त्याच्यासोबत पळ काढते. पण सिंहांचा कळप त्यांच्यावर हल्ला करतात.

वासराला पटकन पळता येत नसल्याने सिंह वासराला धरतात. म्हैस त्यांच्या तावडीतून सुटण्यास, त्यांच्यापासून दूर जाण्यात यशस्वी होते. पण वासरू आपल्यासोबत नाही, ते सिंहांच्या तावडीत सापडलं हे तिला समजतं. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून ती पुन्हा मागे येते. सिंहांच्या कळपात घुसते. आपल्या वासराला आपल्या डोक्याने ढकलतेही जेणेकरून ते सिंहांच्या कळपातून बाहेर पडेल आणि तिथून पळून जाईल.

बस्सं आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती इतकीच धडपड करू शकते. पुढे काही ती करणार तोच सिंह तिच्यावर तुटून पडतात. तिला जमिनीवर आडवं पाडतात आणि तिला खाऊ लागतात. दुसरीकडे ज्या वासरासाठी या आईने मृत्यूला कवटाळलं ते बिचारू वासरूही सिंहांच्या तावडीतून काही सुटत नाही. इतर दोन सिंह त्या वासराची शिकार करताना दिसतात. म्हैस आणि वासराचा जीव वाचला असावा हे हा हल्ला पाहून तरी वाटत नाही. naturegoesmetal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावुक झाले आहेत.

 

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम