शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Viral Video: ती आई होती म्हणूनी! आपल्या बछड्यांना संकटात पाहताच, धावून गेली सिंहीण केलं 'असं' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 11:45 IST

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच भावुक व्हाल. हा व्हिडिओ एका सिंहिणीचा आहे, जी आपल्या बछड्यांना अडचणीत पाहून लगेचच त्यांच्याजवळ मदतीसाठी पोहोचली.

सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे आपल्या मनाला स्पर्श करून जातात. मात्र जेव्हा एखाद्या आईचा भावनिक करणारा व्हिडिओ (Emotional Video of Mother) समोर येतो, तेव्हा नकळतपणे सगळ्यांच्याच डोळ्यातून पाणी येतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच भावुक व्हाल. हा व्हिडिओ एका सिंहिणीचा आहे, जी आपल्या बछड्यांना अडचणीत पाहून लगेचच त्यांच्याजवळ मदतीसाठी पोहोचली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Lioness Viral Video) तुम्ही पाहू शकता की सिंहिण आणि तिचे दोन बछडे नदीच्या काठावर उभा आहेत. हे बछडे अतिशय छोटे आहेत. त्यामुळे ते एका खड्ड्यातून वरती येण्यात अपयशी ठरत आहेत. अशात जेव्हा सिंहिणीची नजर आपल्या पिल्लांवर जाते तेव्हा ती अजिबातही उशीर न करता बछड्यांच्या मदतीसाठी खाली उतरते आणि त्यांना आपल्या जबड्यात पकडून वरती चढवते. एका आईची आपल्या मुलांसाठी सुरू असलेली ही धडपड पाहून नेटकऱ्यांना आपल्या आईची आठवण येत आहे.

हा भावनिक व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ३९ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला सुंदर कॅप्शनही देण्यात आलं आहे. व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर आई आणि पिल्लांमधील या बॉन्डिंगला मोठी पसंती मिळत आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, आई आईच असते, जी स्वतः काहीही सहन करू शकते. मात्र मुलांसाठी प्रत्येक गोष्ट त्याग करते. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, मनाला स्पर्शून जाणारा व्हिडिओ, एक आई अशीही असते. लव्ह यू आई. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर