शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: बिबट्या आणि ब्लॅक पँथर एकमेकांच्या समोर आले, नंतर जे झालं ते पाहुन चूकेल काळजाचा ठोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 17:23 IST

एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. ज्यामध्ये बिबट्या (Leopard) आणि ब्लॅक पँथर (Black panther) एकत्र लढताना दिसत आहेत.

जंगलाच्या दुनियेत एक वेगळाच कायदा असतो. जंगलाचा कायदा मारा किंवा मरा यावरच चालतो. कधी-कधी भक्षक प्राण्यांचे असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) समोर येतात, जे पाहून सोशल मीडिया यूझर्स आश्चर्यचकित होतात. अलीकडे असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. ज्यामध्ये बिबट्या (Leopard) आणि ब्लॅक पँथर (Black panther) एकत्र लढताना दिसत आहेत. खरेतर, हे दोन्ही शिकारी जंगलातील सर्वात क्रूर शिकारींमध्ये गणले जातात, जे त्यांच्या शिकारीला पळून जाण्याची संधीदेखील देत नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा ते एकमेकांशी भिडतात तेव्हा काय होत असेल? असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ब्लॅक पँथर अतिशय वेगाने झाडावर चढत असताना एक बिबट्या त्याची वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. झाडावर चढल्यानंतर हे शिकारी एकमेकांकडे टक लावून पाहतात, असे की जणू ते एकमेकांना खातील. पण यादरम्यान त्यांच्यात कसलीही बाचाबाची होत नाही आणि काही वेळाने ब्लॅक पँथर झाडावरून खाली येतो. हा एक मिनिटाचा व्हिडिओ जंगल सफारीदरम्यान शूट करण्यात आला आहे. जो सौरभ गुप्ता नावाच्या यूझरने शेअर केला आहे. त्याला 18 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1100हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यासोबतच लोक ते पाहून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ लोकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. एका यूझरने सांगितले, की मी Wowww Black Panther आणि Leopard या दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहिले. त्याचवेळी दुसऱ्या यूझरने लिहिले, की ब्लॅक पँथर जरा लाजाळू आहे पण बिबट्याचे असे वागणे पाहून मला आश्चर्य वाटत आहे. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरleopardबिबट्या