शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
3
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
4
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
5
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
6
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
7
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
8
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
9
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
10
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
11
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
13
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
14
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
15
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
16
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
17
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
18
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
19
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
20
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

ग्रेट सॅल्युट! लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बिकट; शिक्षकांनी भरली ५० मुलांची फी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 19:46 IST

अनेक शिक्षकांवर मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. दरम्यान विद्यार्थांबाबत सकारात्मक घटना समोर आली आहे. 

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांची नोकरीसुद्धा गेली आहे. अनेक ठिकाणी नोकऱ्या गेल्यानं लोकांनी स्वतःचा व्यवसाय किंवा लहान मोठं उत्पन्न मिळवून देत असलेल्या धंद्याची सुरूवात केली आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत घर चालवण्यासाठी तसंच पोट भरण्यासाठी पैसे मिळवण्याशिवाय पर्याय नाही. अनेक शिक्षकांवर मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे.दरम्यान विद्यार्थांबाबत सकारात्मक घटना समोर आली आहे. 

कर्नाटकातील शिराहट्टी कॉलेजमध्ये काही मुलांना एडमिशन घेता आलं नाही. कारण लॉकडाऊनमध्ये त्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती. अशा स्थिती कॉलेजमधील शिक्षकांच्या टीमनं या मुलांची मदत केली आहे. जी मुलं एडमिशन घेण्यासाठी पैसे भरू शकत नव्हती अशा मुलांसाठी कॉलेजच्या स्टाफकडून  पैसै जमा केले आणि ५० गरजू विद्यार्थांची फी भरली आहे.

 FM Dabali Arts कॉलेजच्या शिक्षकांनी मिळून पहिल्या आणि द्वितीय वर्षाच्या मुलांच्या फीची रक्कम भरली आहे. या ५० मुलांचे आई वडिल मजूरीचं काम करतात. लॉकडाऊनमध्ये हे काम बंद असल्यानं त्यांना मुलांची कॉलेजची फी भरणं शक्य नव्हतं. शिक्षकांनी मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. 

'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र

शरनू या विद्यार्थ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ''माझे आई वडिल मजुरीचं काम करतात. मी सुद्धा हातभार लावण्यासाठी जे मिळेल  ते काम करतो. सध्या कॉलेजची फी भरण्यासाठी ३ हजार रुपयांची आवश्यकता होती. इतके पैसे मी आणि माझ्या घरातील लोक देऊ शकत नव्हते. म्हणून मी पुढे शिकण्याचा विचार मनातून काढून टाकला होता. आज शिक्षकांनी आमची फी भरल्यामुळे मी एडमिशन घेऊ शकतो. मला या शिक्षकांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत.''

'या' वयातच वाढलेलं वजन कमी करा; अन्यथा गंभीर आजारांसह मृत्यूचा वाढेल धोका

कॉलेजच्या व्यवस्थापकीय विभागातील शिक्षिक व्हाय एस पाटिल यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक विद्यार्थी या दरम्यान वर्गात येत नाहीत कारण आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ही मुलं रोज कामाला जात आहेत. अशा स्थितीत  त्यांच्या अभ्यासाचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांकडून प्रयत्न केले जात आहेत. या कामाबद्दल विदयार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून पालकांमध्ये समाधानाची भावना आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेKarnatakकर्नाटक