शाब्बास पोरा! रस्त्यावर भाजी विकता विकता अभ्यास करणाऱ्या मुलाला पाहून IAS अधिकारी म्हणाले...

By Manali.bagul | Published: January 11, 2021 01:57 PM2021-01-11T13:57:00+5:302021-01-11T14:09:22+5:30

Trending Viral News in Marathi : समाजात अशी अनेक मुलं असतात, ज्यांना आपल्या घरच्या परिस्थितीमुळे इतर मुलांप्रमाणे बालपण इन्जॉय करता येत नाही. तरिही परिस्थितीवर मात करत काही मुलं आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करतात. 

Kids selling vegetables on road and study picture goes viral | शाब्बास पोरा! रस्त्यावर भाजी विकता विकता अभ्यास करणाऱ्या मुलाला पाहून IAS अधिकारी म्हणाले...

शाब्बास पोरा! रस्त्यावर भाजी विकता विकता अभ्यास करणाऱ्या मुलाला पाहून IAS अधिकारी म्हणाले...

googlenewsNext

सोशल मीडियावर सध्या  होतकरू अभ्यासू मुलाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो खूप बोलका असून अनेक गोष्टी या फोटोतून व्यक्त होतात. एकीकडे रस्त्यावर बसून भाज्या विकत असताना दुसरीकडे अभ्याससुद्धा या मुलानं सुरू ठेवला आहे. समाजात अशी अनेक मुलं असतात, ज्यांना आपल्या घरच्या परिस्थितीमुळे इतर मुलांप्रमाणे बालपण इन्जॉय करता येत नाही. तरिही परिस्थितीवर मात करत काही मुलं आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करतात. 

या मुलाचे नाव पुष्पेंद्र साहू असून सध्या तो इयत्ता सातवीत  शिकत आहे. आईएएस अधिकारी अवनीश शरण यांनी रविवारी या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून एक आकर्षक कॅप्शन या फोटोला दिलं आहे. 'आग कुठेही असो, मात्र सदैव जळत राहायला हवं.' असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. आतापर्यंत या फोटोला ११ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून १ हजारापेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. शेकडो लोकांनी या व्हिडीओवर आपली प्रतिक्रियासुद्धा दिली आहे. ना डाएट, ना व्यायाम! १०० वर्षांच्या मॉर्डन आजींना दिला दीर्घायुष्याचा मंत्र, वाचा हे सिक्रेट

या लहान मुलाची मेहनत पाहून सोशल मीडिया युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मोठा होऊन हा मुलगा अधिकारी बनेल आणि आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करेल अश्या कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. इतकंच नाही तर हा फोटो पाहून अनेकांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केला आहे. हा फोटो कधी आणि कुठे काढण्यात आला याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. वाह, शाब्बास! लॉकडाऊनच्या काळात दोन भावंडांनी लिहिले २१०० पानांचे रामायण

Web Title: Kids selling vegetables on road and study picture goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.