हृदयद्रावक!.... म्हणून घर चालवण्यासाठी सरकारी डॉक्टरवर कर्ज काढून रिक्षा चालवण्याची वेळ आली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 01:45 PM2020-09-08T13:45:34+5:302020-09-08T13:49:32+5:30

पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी पैसे हातात असायलाच हवेत.

karnataka government senior doctor turns into auto rickshaw driver after harassed by ias offcer | हृदयद्रावक!.... म्हणून घर चालवण्यासाठी सरकारी डॉक्टरवर कर्ज काढून रिक्षा चालवण्याची वेळ आली

हृदयद्रावक!.... म्हणून घर चालवण्यासाठी सरकारी डॉक्टरवर कर्ज काढून रिक्षा चालवण्याची वेळ आली

Next

कोरोनाच्या माहामारीनं अनेकांना कधीही उद्भवलेल्या भीषण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. लॉकडाऊनमुळे जगभरातील देशांतील अर्थव्यवस्थेवर तणाव पडल्यानं अनेकांना नोकरी गमवावी लागली तर मोठ्या संख्येनं लोक मिळेल ते काम करण्यासाठी तयार झाले. कारण पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी पैसे हातात असायलाच हवेत.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देशभरात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. कोरोनायोद्ध्ये दिवसरात्र काम करून कोरोना रुग्णांचा जीव वाचवत आहेत. अशा स्थितीत कर्नाटकातील  एका वरिष्ठ डॉक्टरावर रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीसाठी डॉक्टरांनी आयएएस अधिकारी आणि सरकारी अधिकारी यांना जबाबदार धरले आहे.

या डॉक्टरांचे नाव रविंद्रनाथ असून वय ५३ आहे. कर्नाटकातील बेल्लारीच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात २४ वर्षांपासून हे डॉक्टर कार्यरत होते. आता दावणगिरी शहरात रिक्षा चालवत आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या या अवस्थेसाठी आयएएस अधिकाऱ्यांना दोष दिला आहे. रविंद्रनाथ यांनी सांगितले की, एका अधिकाऱ्याने पोस्टिंगमध्ये मदत करण्यास नकार दिल्यानंतर २०१८ मध्ये त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली.

जून २०१९ ला निलंबन

ग्रामीण भागात तब्बल  १७ वर्ष कार्यरत असलेल्या या डॉक्टरांना सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणाली सुधारण्यासाठी पुरस्कारही देण्यात मिळाला आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या एका सीईओने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना त्रास द्यायला सुरूवात झाली. आरोग्य कर्मचार्‍यांच्या आउटसोर्सिंगमध्ये तांत्रिक समस्या दर्शविल्यानंतर गेल्या वर्षी ६ जून २०१९ रोजी रवींद्रनाथ यांना निलंबित करण्यात आले. रविंद्रनाथ यांनी कर्नाटक प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (KAT) अपील केले, त्यानंतर सरकारकडून त्यांच्या पुर्ननियुक्तीचे आदेश आले होते.

कर्जकाढून रिक्षा चालवण्याची वेळ

रविद्रनाथ यांनी सांगितले की, ''पोस्टिंग करताना त्यांनी मुद्दाम तालुक्याला पाठवले. त्यानंतर परत एकदा केस केएटीकडे गेली आणि तिथून मला जिल्हास्तरावर नियुक्ती करण्याची सूचना देण्यात आली होती. आदेश असूनही, मी आतापर्यंत पोस्टिंग होण्याच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या १५ महिन्यांपासून मला पगार सुद्धा मिळाला नाही. म्हणून घर चालवण्यासाठी माझ्यावर रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. ही रिक्षा घेण्यासाठीही मी कर्ज काढलं आहे.'' अशा शब्दात डॉक्टर रविंद्रनाथ त्यांना आपली व्यथा मांडली आहे.

हे पण वाचा-

'आम्ही आमचा बाप गमावलाय'; नाशिकच्या मुलीनं Video शेअर करत सांगितलं, कोरोनाला हलक्यात घेऊ नका!

नादच खुळा! अमेरिकेतील लाखो रुपयांची नोकरी सोडली; अन् कणसाची शेती करतोय 'हा' तरूण

Web Title: karnataka government senior doctor turns into auto rickshaw driver after harassed by ias offcer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.