शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अजबच...! म्हशीचा मालक कोण? भांडण सोडवण्यासाठी 'डीएनए टेस्ट'; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:54 IST

देवनागरी जिल्ह्यात 2021 मध्येही असाच वाद उद्भवला होता, तेव्हाही म्हशींच्या मालकीचा वाद डीएनए चाचणीद्वारेच सोडवण्यात आला होता.

कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे म्हशीची डीएनए टेस्ट करून तिची मालकी ठरवली जात आहे. खरे तर, ही म्हैस एका मंदिराची असून शेकडो लोक तिची पूजा करतात. मात्र या म्हशीचा मालक कोण? यावरून दोन गावांमध्ये वाद सुरू आहे. हे प्रकरण कर्नाटकातील देवनागरी जिल्ह्यातील आहे. येथील कुनीबेलाकेर आणि कुलगट्टे गावांतील हा वाद आहे. दोन्ही गावांमधील अंतर सुमारे 40 किमी आहे. सध्या या म्हशीला शिवमोग्गा गोशाळेत पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. देवनागरी जिल्ह्यात 2021 मध्येही असाच वाद उद्भवला होता, तेव्हाही म्हशींच्या मालकीचा वाद डीएनए चाचणीद्वारेच सोडवण्यात आला होता.

असं आहे संपूर्ण प्रकरण - गेल्या आठ वर्षांपूर्वी कुनीबेलाकेर गावातील करियम्मा देवीला एक म्हैस अर्पण करण्यात आली होती. यानंतर आता बेलेकर गावात नुकतीच एक म्हैस आढळून आली. ही म्हैस होनाळी तालुक्यातील कुलगट्टे गावातून बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कुलगट्टे गावातील लोकांनी ही म्हैस आपल्या गावी नेली आहे. संबंधित म्हैस गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे याच गावातील मंडप्पा रंगनवार सांगतात. आता कुनीबेलाकर गावातील लोक या म्हशीवर आपला हक्क सांगत आहेत. हा वाद वाढत गेल्याने आता यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

महत्वाचे म्हणजे, म्हशीच्या वयाचाही वाद आहे. म्हशीचे वय आठ वर्षे आहे, असा दावा कुनीबेलाकेरचे लोक करत आहेत. याच बरोबर म्हशीचे वय तीन वर्षे असल्याचे कुलगट्टा येथील लोक सांगत आहेत. तर पशुवैद्यकांच्या मते संबंधित म्हशीचे वय सहा वर्षं आहे. जे कुनीबेलाकेर गावाच्या दाव्या नजिक जाणारे आहे. मात्र, कुलगट्टे गावातील लोक हे मान्य करण्यास तयार नाहीत. यानंतर आता कुलगट्टे गावातील सात जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करत डीएनए चाचणीची मागणी केली आहे. 

यासंदर्भात बोलताना, देवनागरी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार संतोष यांनी म्हटले आहे की, डीएनए सॅम्पल कलेट्क करण्यात आले आहे. निकालानंतर वाद संपुष्टात येईल.

टॅग्स :Karnatakकर्नाटकTempleमंदिर