शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: आपल्या कुत्र्यासाठी कांगारुसोबत भिडला व्यक्ती, शेवटी वेळ आली पश्चातापाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 17:24 IST

एक व्यक्तीची आणि कांगारूची लढाई झाली आहे. एका श्वानासाठी प्राणी आणि माणूस आपसात भिडले.

प्राण्यांची प्राण्यांसोबत, माणसांची माणसांसोबत फायटिंग तुम्ही पाहिली असेल. पण प्राणी आणि माणसांची फायटिंग क्वचितच पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक व्यक्तीची आणि कांगारूची लढाई झाली आहे. एका श्वानासाठी प्राणी आणि माणूस आपसात भिडले (Kangaroo man fight).

कांगारू लढाईसाठी खूप प्रसिद्ध आहेत. आपल्या विरोधकांना ते लाथाबुक्क्यांनी मारहाण करतात. मग विचार करा, या कांगारूसमोर एखादा माणूस असेल तर त्याचं काय होईल. श्वानासाठी आमनेसामने आलेल्या माणूस आणि कांगारूचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. व्यक्तीने आपल्या श्वानांना वाचवण्यासाठी कांगारूचा सामना केला. त्याच्यासमोर छाती ताणून त्याच्याशी दोनहात करायला उभा राहिला. कांगारूनेही या व्यक्तीवर भयानक हल्ला केला. या लढाईत तरुणासोबत जे घडलं ते पाहूनच धडकी भरते.

व्हिडीओत पाहू शकता एका छोट्याशा तलावाजवळ एक व्यक्ती उभी आहे, त्याच्यासोबत त्याचा पाळीव कुत्रा आहे. इतक्यात एक कांगारू तिथं येतो. त्याच्यापासून आपल्या कुत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करते. आपल्या कुत्र्यांना लांब करून कांगारूला सामोरं जाते. त्याचवेळी कांगारू त्या व्यक्तीवर हल्ला करतं, त्याला लाथ मारतं. त्यानंतर ही व्यक्ती जमिनीवर धाडकन कोसळते. आपल्या मालकावर हल्ला झालेला पाहताच त्याचे श्वानही कांगारूवर भुंकू लागतात.  श्वानाला वाचवण्यासाठी या व्यक्तीला कांगारूच्या लाथाबुक्क्या खाव्या लागल्या.

या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनीच ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम