शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जलेबीवर कांदा, दही अन् शेव; लोक म्हणाले, "अरे कुठे फेडाल ही पापं?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 20:45 IST

जिलेबी हा अनेकांना आवडता पदार्थ असतो. गोड आणि खुशखुशीत जिलेबीची आठवण आली तरी तोंडाला पाणी सुटतं. मात्र या जिलेबीसोबत जर वाट्टेल ते कॉम्बिनेशन केलं, तर मात्र त्या पदार्थाची पूर्ण रयाच निघून जाते. नुकत्याच ट्विटरवर अपलोड झालेल्या जिलेबीच्या एका फोटोनं पदार्थांच्या विक्षिप्तपणाचे सगळे रेकॉर्डच तोडून टाकले आहेत.

जिलेबीवर (Jalebi) जर कुणी कांदा, दही आणि मसाला (Onion, Curds and Spices) घालून तुम्हाला खायला दिलं, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? हा काय विचित्र प्रकार आहे, असाच प्रश्न कुणालाही पडेल. गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि (Social Media) इतर सोशल मीडियावर चित्रविचित्र रेसिपींना (Weird recipes) अक्षरशः ऊत आला आहे. कुठल्याही पदार्थाचा मूळ गुणधर्म बदलून त्याच्यासोबत वाट्टेल त्या पदार्थाचं कॉम्बिनेशन करायचं आणि तो पदार्थ सोशल मीडियावर अपलोड करायचा, असा ट्रेंडच तयार होऊ लागला आहे. 

जिलेबी हा अनेकांना आवडता पदार्थ असतो. गोड आणि खुशखुशीत जिलेबीची आठवण आली तरी तोंडाला पाणी सुटतं. मात्र या जिलेबीसोबत जर वाट्टेल ते कॉम्बिनेशन केलं, तर मात्र त्या पदार्थाची पूर्ण रयाच निघून जाते. नुकत्याच ट्विटरवर अपलोड झालेल्या जिलेबीच्या एका फोटोनं पदार्थांच्या विक्षिप्तपणाचे सगळे रेकॉर्डच तोडून टाकले आहेत.

व्हिडिओत दिसणाऱ्या प्लेटमध्ये तीन जिलेब्या ठेवल्या आहेत. त्यावर दही टाकण्यात आलं आहे आणि वरून शेव, पापडी टाकून त्याला सजवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जिलेबीसोबत कांदा पाहून तर अनेकांच्या पोटातच कळ आली आहे. कुठल्या पदार्थाबरोबर काय खावं, हे प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीलादेखील समजत असतं. एखादी गोष्ट खाण्याअगोदर त्या कॉम्बिनेशनच्या कल्पनेनंही मळमळायला सुरुवात होऊ शकते, याचा अनुभव हा फोटो पाहणारे युजर्स घेत आहेत.

हा फोटो पाहून लोकांना राग आला आहे. त्यात हा फोटो अपलोड करणाऱ्याने विकेंडनिमित्त माझ्याकडून सर्वांना भेट, असं म्हटलं आहे. त्यामुळे तर जिलेबीप्रेमी अधिकच खवळले आहेत. एखाद्याला जिलेबी खायची इच्छा असेल, तर हा फोटो पाहून तीदेखील मरून जाईल, असं एकानं म्हटलं आहे, तर या पापाची शिक्षा कुठे फेडशील, असा सवाल दुसऱ्याने केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाReceipeपाककृतीRecipeपाककृती