शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

Viral Video: जॅग्वारने केली पाण्यातील मगरीची अशी शिकार की, व्हिडिओ पाहुनच धडकी भरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 12:00 IST

मगर आपल्या शिकारीला पाण्यात घेऊन जाते आणि मारून टाकते. या प्राण्यांचं मांस खाऊन ती आपली भूक भागवते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ अतिशय वेगळा आहे.

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की पाण्यातील सगळ्यात खतरनाक प्राणी म्हणजे मगर असते. त्यामुळे पाण्यातील मगरीसोबत कधीही पंगा घेऊ नये. मगरीला पाण्यातील राक्षस असंही म्हटलं जातं. पाण्यात मगरीसोबत पंगा घेणं म्हणजे, स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं आहे. कारण जंगलात सिंह आणि पाण्यात मगरच राजा असते. अगदी लहानांपासून मोठे प्राणीही मगरीपासून दूर राहातात.

तुम्ही अनेक असे व्हिडिओ पाहिले असतील ज्यात मगर पाण्यातून बाहेर येऊनही प्राण्यांची शिकार करते. इतकंच नाही तर अनेक व्हिडिओमध्ये तर मगर सिंह किंवा बिबट्याची शिकार करतानाही दिसते. यानंतर मगर आपल्या शिकारीला पाण्यात घेऊन जाते आणि मारून टाकते. या प्राण्यांचं मांस खाऊन ती आपली भूक भागवते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ अतिशय वेगळा आहे (Video of Leopard Hunts Crocodile).

व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल (Shocking Video of Wild Animal). यात एक जॅग्वार पाण्यात शिरून मगरीची शिकार करताना दिसतो. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की मगर पाण्यातून बाहेर येत आराम करत आहे. इतक्यात एका जॅग्वारची नजर मगरीवर पडते आणि मगरीची शिकार करण्यासाठी तो पाण्यात उतरतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जॅग्वार दुरूनच मगरीची शिकार करण्याच्या तयारीत तिच्या जवळ पोहोचतो आणि अचानक तिची मान पकडतो. जॅग्वारने ज्यापद्धतीने मगरीची शिकार केली, ते पाहून कोणीही थक्क होईल. एखाद्याच्या घरात शिरून त्यालाच मारणं अतिशय अवघड काम असतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जॅग्वार मगरीला आपल्या दातांनी तोपर्यंत दाबून ठेवतो, जोपर्यंत मगरीचा मृत्यू होत नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJaguarजॅग्वारYouTubeयु ट्यूब