प्रयागराज - महाकुंभमध्ये आयआयटीवाले बाबा म्हणून प्रसिद्धी मिळालेले अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेत आलेत, त्यामागचं कारण म्हणजे त्यांनी बदललेला त्यांचा लूक. दाढी कापली, आता क्लीन शेव करून ते समोर आलेत. लांब केस तसेच ठेवलेत. २-३ महिन्यातून मी लूक बदलतो, जेव्हा दाढी वाढते तेव्हा कापतो, मी रात्री महादेवाला सांगितले, उद्या शेव करेन, रुप बदलेन तसे केले असंही अभय सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
अभय सिंह जेव्हा महाकुंभमध्ये पोहचले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दाढी वाढली होती, लांबडे केस होते. तेव्हा काही चॅनेलने त्यांची मुलाखत घेतली त्यात ते आयआयटी पदवीधर असल्याचं समोर आले. त्यानंतर सोशल मीडियात अभय सिंह यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. रातोरात अभय सिंह प्रसिद्धीझोतात आले. आता लूक बदलल्यामुळे ते चर्चेत आहेत. मी याआधीही असं केले आहे. जेव्हा मी या कुंभमेळ्यात आलो, तेव्हा महादेवाने मला २ गोष्टी सांगितल्या. एका ठिकाणी एकच रात्र थांबायचे आणि पुढे निघून जायचे. १ किमी, २ किमी...चालतच राहायचे. २-३ महिने झाले दाढी वाढली होती त्यामुळे मी कापून टाकली असं अभय सिंह यांनी स्पष्ट केले.
त्याशिवाय कानातील कुंडल घालण्यावरूनही त्यांनी मी या गोष्टी यासाठी करत नाही, कारण ते साधू करतात. मी केवळ अध्यात्मात या वस्तूंचा वापर केला जातो, मग ती माळ घालणे असेल, टिक्का लावणे असेल अथवा धोती घालणे. हे सर्व मला आवडते म्हणून मी घालतो असंही अभय सिंह यांनी म्हटलं. विशेष म्हणजे आयआयटीवाले बाबाचा हा लूक ओळखणं अनेकांसाठी कठीण झालं आहे. सध्या हा लूक सोशल मीडियात चर्चेत आला आहे.
दरम्यान, मी दाढी-मिशा ठेवल्या तर हे लोक मला आयआयटीवाले बाबा बोलत होते. भगवान शंकर, भगवान श्रीकृष्ण यांनीही दाढी ठेवली नव्हती परंतु त्यांना कुणी श्रीकृष्ण बाबा बोलत नाही. त्यासाठी मीदेखील स्वत:ला क्लीन शेव केले आहे. तसं तर सर्वांच्या आत देव असतो, अहम ब्रह्मास्मि हे तर शंकराचार्याने म्हटलं होते असं अभय सिंह यांनी सांगितले.