शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...! स्टंट दाखवण्याच्या नादात मगरीच्या जबड्यात हात घालणं पडलं महागात; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:59 IST

man put his hand in crocodiles jaw see what happened while showing stunt video

मगरीचे अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी त्यांचे लोकांवर हल्ला करतानाचे, तर कधी पाण्याखालचे व्हिडिओ समोर येत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हडिओमध्ये, एका व्यक्तीने स्टंट दाखवताना मगरीच्या जबड्यात हात घातला आणि मगरीने हल्ला करत तिचा हात पकडला. यानंतर, ती व्यक्ती कशीबशी तडफड करून मगरीच्या तावडीतून सुटल्याचे दिसत आहे.

आधीपासूनच उघडा होता जबडा - हा व्हिडिओ एका युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पाण्याने भरलेल्या एका पूलच्या बाजूला ही स्टंटबाजी सुरू आहे. महत्वाचे म्हणजे त्या मगरीचा जबडा आधीपासून उघडा आहे. ही संपूर्ण घटना एखाद्या शो दरम्यान घडल्याचे दिसत आहे. सर्वप्रथम संबंधित व्यक्ती त्या मगरीजवळ गेल्यानंतर, एका स्टिकच्या सहाय्याने मगरीचा जबडा चेक करते. मात्र, यानंतर ती व्यक्ती एकदमच तिचा हात मगरीच्या जबड्यात घालते. सुरुवातीला मगर काहीच प्रतिक्रिया देत नाही. मात्र, नंतर जे घडले ते थरकाप उडवणारे आहे.

स्टंटमॅन तडफडू लागला अन्... या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, त्या व्यक्तीने आपला हात मगरीच्या जबड्यात घातल्यानंतर, मगरीने हल्ला केला आणि तिचा हात पकडला. यानंतर कशी बशी धडपड करून त्या व्यक्तीने मगरीच्या जबड्यातून आपला हात सोडवला. या व्यक्तीच्या हातातून रक्त उडतानाही दिसत आहे. यानंतर ती व्यक्ती तेथून लगेच निघून गेली. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम