शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Video : बॉयफ्रेन्डने लग्नासाठी गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज, पोलिसांनी लगेच कपलला केली अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 12:42 PM

एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासन सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इराणचा असून यात एका कपलने एकमेकांना लग्नासाठी प्रजोज केलं.

(Image Credit : BroBible)

एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासन सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इराणचा असून यात एका कपलने एकमेकांना लग्नासाठी प्रपोज केलं. पण त्यानंतर लगेच पोलिसांनी दोघांनाही अटक केली. या कपलने पब्लिक स्पेसमध्ये एकमेकांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी मुस्लिम धर्माच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. पण काही वेळाने दोघांना जामिनावर सोडण्यात आले होते. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओनुसार, इराणच्या अराक शहरातील एका मॉलमध्ये एक तरूण रंगीबेरंगी फुग्यांमध्ये गुडघ्यावर बसून प्रेयसीला प्रपोज करत आहे. यावेळी त्याने तिला अंगठी देऊन प्रपोज केलं. तरूणाचं हे लग्नाचं प्रपोजल तरूणीनेही लगेच स्विकारलं. त्यांच्या या आनंदाच्या क्षणात इतरही लोकांनी सहभाग घेत टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. 

दोघांचीही ओळख पटली आहे. अराक शहर पोलीस प्रमुखांनी सांगितले की, अशाप्रकारच्या गोष्टी भलेही जगाच्या काही भागांमध्ये मान्य असतील. पण इराणच्या कायद्यानुसार आणि धर्मानुसार हे अमान्य आहे. म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. 

तेहरान बार असोसिएशनने या कपलला अटक करण्यावर टिका केली आहे. यावर त्यांनी सांगितले की, कपलने कोणतही चुकीचं काम केलं नव्हतं. त्यांनी कुणाला नुकसानही पोहोचवलं नाही आणि सार्वजनिक वस्तूंचंही नुकसान केलं नाही. त्यामुळे त्यांना केलेली अटक चुकीचं होती. 

टॅग्स :IranइराणSocial Viralसोशल व्हायरल