सोशल मीडियावर एका व्यक्तीने केलेल्या दाव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. डॉक्टरांनी जखमेला टाके मारण्याऐवजी चक्क 'स्टेपलरच्या पिन' लावल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जेव्हा तो माणूस आपल्या डोक्याची जखम दाखवतो, तेव्हा तिथे स्टेपलरच्या पिनसारखी रचना दिसते.
डॉक्टरांनी जखमेसाठी टाके घालण्याऐवजी स्टेपलरचा वापर केल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने आपली जखम दाखवत डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. काही युजर्स डॉक्टरांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर काही जण या आरोपाला 'ज्ञानाचा अभाव' म्हणत आहेत.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रुग्ण सांगतो की, गावातील एका डॉक्टरांनी हे केलं आहे. ही घटना बिहारच्या नवादा जिल्ह्यातील वारसलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ बनवणारी व्यक्ती आधी रुग्णाची जखम दाखवते आणि नंतर डॉक्टरांबद्दल विचारते. या व्हिडिओमध्ये डॉक्टरांवर आरोप केला आहे की, त्यांनी टाके लावण्याऐवजी साध्या स्टेपलरचा वापर केला आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @ashokyadav39402 या हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत ९ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून २४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. युजर्स यावर मजेशीर आणि संतप्त कमेंट्स करत आहेत. कोणी याला शिक्षणाचा अभाव म्हणत आहे, तर कोणी डॉक्टरांच्या पदवीवर शंका घेत आहे.
काय असतं 'सर्जिकल स्टेपलर'?
वैद्यकीय क्षेत्रात जखमेसाठी 'सर्जिकल स्टेपलर' वापरले जातात, जे ऑफिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या साध्या स्टेपलरपेक्षा पूर्णपणे वेगळं असतात. जर डॉक्टरांनी सर्जिकल स्टेपलरचा वापर केला असेल, तर ते टाक्यांच्या तुलनेत जखम लवकर भरण्यास मदत करतात. याशिवाय, शस्त्रक्रियेचा वेळ वाचवण्यासाठीही याचा वापर केला जातो. मात्र जर खरोखरच कोणी साध्या स्टेपलर पिनचा वापर केला असेल, तर तो अत्यंत गंभीर निष्काळजीपणा आहे आणि यामुळे इन्फेक्शन होण्याचा मोठा धोका असतो.
Web Summary : A viral video claims a doctor used a regular stapler on a patient's head wound instead of stitches, sparking online outrage. While surgical staplers exist for wound closure, using a standard stapler is dangerous and could cause infection.
Web Summary : एक वायरल वीडियो में दावा किया गया है कि एक डॉक्टर ने टांके की जगह मरीज के सिर के घाव पर स्टेपलर का इस्तेमाल किया, जिससे ऑनलाइन आक्रोश फैल गया. हालांकि घाव भरने के लिए सर्जिकल स्टेपलर मौजूद हैं, लेकिन साधारण स्टेपलर का इस्तेमाल खतरनाक है और इससे संक्रमण हो सकता है।