शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तरुणांचा जुगाड, सोफ्यापासून बनवली कार; 'Video' पाहून आनंद महिंद्रा झाले अवाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:56 IST

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

Viral Video : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आपल्याला आवडणाऱ्या संशोधकांचे तसेच तरुणाईच्या कौशल्याचे कौतुक करणारे व्हिडीओ ते सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर केलाय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन तरुणांनी चक्क सोफ्याचे रुपांतर कारमध्ये केल्याचं पाहायला मिळतंय. त्यावर आनंद महिंद्रा यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवरुन शेअर केलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणांनी एक सोफा ऑर्डर केल्याचे पाहायला मिळतं आहे. त्यानंतर या तरुणांनी स्वत: तयार केलेली चाके आणि वाहनांची मोटार मशीन सोफ्यामध्ये फीट केली. आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर त्यांनी या सोफ्याचा कायापालट करुन टाकला. बसण्याचा सोफ्याचा असाही वापर होऊ शकतो, असा विचार तुमच्याही डोक्यात आला नसेल. या दोन तरुणांचा हा भन्नाट जुगाड आनंद महिंद्रा यांच्या पसंतीस उतरला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर आनंद महिंद्रा प्रभावित होऊन त्यांनी सोशल मीडियावर याबाबत कौतुक करणारे ट्विट देखील केले आहे. 

आनंद महिंद्रा म्हणाले... 

हा एक भन्नाट प्रकल्प आहे. पण ही युक्ती प्रत्यक्षात कृतीत आणण्याकरिता या दोन तरुणांनी किती काळजीपूर्वक आणि अभियांत्रिकी कौशल्याचा वापर केलाय हे अविश्वसनीय आहे. कोणत्याही देशाला ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अशा संशोधक वृत्तीच्या सर्जनशील अभियत्यांची गरज आहे. शिवाय भारतासारख्या देशात अशा प्रकारचे वाहन आरटीए कार्यालयात नेल्यास तेथील कर्मचारी काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे मजेशीर असेल, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राSocial Mediaसोशल मीडिया