अवघ्या १०० रुपयांसाठी आईचं चिमुकल्यासोबत निर्दयी कृत्य; घटना वाचून धक्काच बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 10:09 AM2021-10-03T10:09:59+5:302021-10-03T10:11:10+5:30

इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळ दक्षिण तंगोरांगमध्ये राहणारी आई तिच्या १० महिन्याच्या मुलाला दररोज भिकाऱ्याला भाड्याने द्यायची.

Indonesian mother gave her baby to rent to beggars and painted body with silver color to make him | अवघ्या १०० रुपयांसाठी आईचं चिमुकल्यासोबत निर्दयी कृत्य; घटना वाचून धक्काच बसेल

अवघ्या १०० रुपयांसाठी आईचं चिमुकल्यासोबत निर्दयी कृत्य; घटना वाचून धक्काच बसेल

Next
ठळक मुद्देभिकारी लहान मुलाच्या शरीरावर सिल्वर रंगाने पेंट करून त्याला ममीसारखा बनवायचा.सोशल मीडियावर या मुलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तात्काळ विभागाने याची दखल घेतली आहेकुठल्या परिस्थितीमुळे पालकांनी हे कृत्य केले. त्यांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षित करणार आहोत

पैशांसाठी एक आई तिच्या चिमुकल्यासोबत जे कृत्य करायची ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या हृद्रयद्रावक घटनेनंतर आईला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याचसोबत लहान चिमुकल्याला बालसुधार गृहात पाठवलं आहे. केवळ १ पाऊंड(१०० रुपये) साठी तीआई स्वत:च्या जिवंत मुलाला दररोज ममी बनवत होती हे सगळ्यांच्या समोर आल्यानं तिचा बुरखा फाटला आहे.

चिमुकल्याला भाड्याने देत होती

इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळ दक्षिण तंगोरांगमध्ये राहणारी आई तिच्या १० महिन्याच्या मुलाला दररोज भिकाऱ्याला भाड्याने द्यायची. भिकारी लहान मुलाच्या शरीरावर सिल्वर रंगाने पेंट करून त्याला ममीसारखा बनवायचा. त्यानंतर रस्त्यावर त्या मुलाला घेऊन रोज त्याच्या नावावर भीक मागायचा. त्या बदल्यात भिकारी बाळाच्या आईला १ पाऊंड म्हणजे २० हजार इंडोनेशियाई(भारतीय मुद्रेत १०० रुपये) द्यायचा. या मुलाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुलाच्या पालकांवर कारवाई

द सनच्या रिपोर्टनुसार, मुलाची आई रोज सकाळी त्याला भाड्याने देत होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण तंगेरांगच्या सोशल सर्व्हिस विभागाचे प्रमुख वाहुनोतो लुकमान यांनी सांगितले की, सोशल मीडियावर या मुलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तात्काळ विभागाने याची दखल घेतली आहे. मंत्रालयाने आई आणि मुलगा दोघांनाही ताब्यात घेतलं असून मुलाच्या भविष्यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्याचसोबत कुठल्या परिस्थितीमुळे पालकांनी हे कृत्य केले. त्यांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षित करणार आहोत असं त्यांनी म्हटलं.

कोरोना महामारीनंतर रोजगारावरुन देशात समस्या वाढली आहे. इंडोनेशियातील रस्त्यावर सिल्वर रंगाचे पुतळे बनलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. हे लोक पोट भरण्यासाठी भीक मागत असतात. पण सिल्वर रंग अनेक प्रकारच्या त्वचा रोगाचं कारण बनत आहे. त्यामुळे लहान मुलांसह अनेकांना केमिकलमिश्रित रंगाने नुकसान होऊ शकतं.  

Web Title: Indonesian mother gave her baby to rent to beggars and painted body with silver color to make him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.