नवी दिल्लीः लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या जगातले दोन दिग्गज फुटबॉलपटू आहेत. परंतु हे दोघे मिळूनही भारतातल्या गाय फुटबॉलर करून बॉल घेऊ शकत नाहीत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सोशल मीडियावर या गाय फुटबॉलरचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. तिला दुसऱ्याला बॉल देण्याची अजिबात इच्छा नाही. मैदानातील इतर मुलंही त्या गाईला हटकून बॉल घेण्याचा प्रयत्न करत आहेत.पण ती गाय त्यांना पळवून लावत आहे. हा व्हिडीओ गोव्यातील एका मैदानावरचा आहे. मैदानावर ही मुलं फुटबॉलची प्रॅक्टिस करत होती. त्याचदरम्यान एक गाय मैदानावर आली आणि फुटबॉलवर कब्जा मिळवला. जेव्हा मुलांनी गायकडून फुटबॉल परत घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गाईनं त्यांना अंगावर येत पळवून लावलं. त्यानंतर मोक्याच्या शोधात असलेल्या त्या मुलांनी गाईचं लक्ष भरकटल्यावर लागलीच तो फुटबॉल परत मिळवला. विशेष म्हणजे गाय फुटबॉल घेऊन गोल पोस्टच्या जवळ पोहोचली होती.
'या' गाईसमोर मेस्सी अन् रोनाल्डोची फुटबॉल स्कील फिकी, पाहा भन्नाट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 13:48 IST