शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजला जाणाऱ्या मेहुणीला दाजीनं अडवलं; कारमध्ये गुंगीचा लाडू देऊन मंदिरात केलं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 17:06 IST

अल्पवयीन तरूणीचे अपहरण करून तिच्याशी विवाह केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी दिल्ली : अल्पवयीन तरूणीचे अपहरण करून तिच्याशी विवाह केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे नात्याने दाजी असलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मेहुणीला गुंगीचे लाडू खाऊ घालून तिचे अपहरण केले. याशिवाय तिला मंदिरात नेऊन तिच्याशी लग्न केले. या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या प्रकरणी पीडित तरूणी न्यायासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहे. पीडितेच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, तरूणीसोबत ही घटना घडली तेव्हा ते कामानिमित्त गुजरातमधील अहमदाबाद येथे होते. 

गुंगीचा लाडू देऊन केले लग्नपीडितीने दिलेल्या माहितीनुसार, ती छत्तीसगढ रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अत्रौली गावातील रहिवासी असून कृषक इंटर कॉलेजमध्ये इयत्ता नववीत शिकत आहे. 12 ऑक्‍टोबर रोजी कॉलेजला जाताना तिचा दाजी अवधेश केसरवाणी हा 'बसला' गावाजवळ चारचाकी गाडीत आपल्या कुटुंबीयांसोबत तिला भेटला. 'मी तुला कॉलेजला सोडतो' असे तो म्हणाला. पीडिता गाडीत बसताच तिला त्याने गुंगीचा लाडू खायला दिला, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, अवधेशने तिला कॉलेजमध्ये न सोडता एका मंदिरात नेऊन साडी नेसून लग्न केले आणि काही बोलल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

पीडीतेच्या कुटुंबीयांकडून खटला दाखल आरोपी दाजीने लग्न केल्यानंतर पीडितेला खजुरिया कला गावातील तिच्या घरी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आणि त्यानंतर रात्री 8 वाजता तिला अत्रौली गावाबाहेर सोडले. तिथून पीडितेने घरी पोहोचून तिच्या आईला सर्व घटनेची माहिती दिली. ही सर्व हकीकत पीडितेच्या आईने अहमदाबाद येथे असलेल्या आपल्या पती आणि मुलाला फोनवरून सांगितली. पीडितेचे वडील आणि भाऊ अहमदाबादहून आले आणि त्यांनी रायपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना ही बाब सांगितली. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने नाराज झालेल्या पीडितेने तिच्या नातेवईकांसह बुधवारी जिल्हा मुख्यालय कारवी गाठून अधीक्षकांना माहिती दिली. या घटनेबाबत पोलीस अतुल शर्मा यांनी माहिती देताना पीडितेला न्याय मिळेल असे सांगितले. 

मंदिरात लग्न केल्याचे फुटेज आले समोर पीडितेचे वडील आणि भाऊ यांनी आरोपी अवधेश केसरवानी आणि त्याच्या नातेवाईकांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच बळजबरीने मंदिरात लग्न लावल्याचा आरोप करत रायपुरा पोलीस ठाण्यातील पोलीस ऐकत नसल्याचा गंभीर आरोपही केला. आरोपी अवधेश केसरवाणी व त्याच्या नातेवाईकांवर कायदेशीर कारवाई करून न्याय देण्याची मागणी पीडितेच्या भाऊ व वडिलांनी केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मंदिरात लग्न केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा फोटोही अर्जासोबत जोडण्यात आला आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नcollegeमहाविद्यालय