शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

"पप्पा, मी सीए झाली"; चहावाल्याच्या मुलीची नेत्रदिपक भरारी, टोमणे मारणाऱ्यांची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:50 IST

सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अमिताने तिच्या वडिलांना मिठी मारतानाचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे.  अमिता प्रजापतीने नेत्रदिपक भरारी घेतली आहे.  २०२४ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अमिताने तिच्या वडिलांना मिठी मारतानाचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. १० वर्षांचे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयानंतर तिचं स्वप्न अखेर सत्यात उतरलं. जे अशक्य वाटत होतं ते अखेर शक्य झालं.

अमिताने लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये तिचा प्रवास शेअर केला. अभ्यासात हुशार नाही असं तिच्यावर लेबल लावलं जात होतं. पण तिने मोठं स्वप्न पाहण्याचं धाडस केलं. तिचे पालक उदरनिर्वाहासाठी चहा विकायचे, त्यांना अनेक लोकांनी टोमणे मारले. विविध समस्यांचाही त्यांना सामना करावा लागला. 

"तुमची मुलगी सीए होणार नाही"

अमिताच्या वडिलांनी जेव्हा मुलीच्या शिक्षणाचा विचार केला. तेव्हा त्यांच्या या निर्णयावर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ते झोपडपट्टीत राहत होते. त्यामुळे मुलीच्या शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून घर बांधण्याचा अनेकांनी सल्ला दिला. तुमची मुलगी सीए होऊ शकणार नाही. तुम्ही तुमच्या मोठ्या झालेल्या मुलींसोबत रस्त्यावर किती काळ राहणार? ती एक दिवशी निघून जाईल आणि तुमच्याकडे काहीही उरणार नाही असं लोकांनी म्हटलं. 

वडिलांचे पाणावले डोळे

अमिताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाच्या यशाची बातमी ऐकून वडील भावुक होताना दिसत आहेत. अमिता तिच्या वडिलांना मिठी मारते तेव्हाचा हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळतो. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. आज मी जे काही आहे ते माझ्या वडिलांमुळे आणि आईमुळे आहे, ज्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला असं अमिताने सोशल मीडियावर म्हटलं आहे. कठीण परिस्थितीतही हार मानली नाही आणि कठोर परिश्रम करत राहिलो तर आपल्याला नक्कीच यश मिळतं हे अमिताने सिद्ध केलं आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी