शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला IAS ने विद्यार्थ्यांसोबत केला जबरदस्त डान्स; सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 09:48 IST

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आयएएस (IAS) अधिकारी  बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडिया हे एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे सर्व लोक आपली मते खुलेपणाने मांडतात. आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट पाहता क्षणी व्हायरल होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आयएएस (IAS) अधिकारी  बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला लोकांनी खूप लाईक्स केले आहे. 

अनेक नेटिझन्सनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिला आयएएस अधिकारी एका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. त्यांचे नाव दिव्या एस अय्यर (Divya S Iyer) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या एस अय्यर या केरळच्या पथनामथिट्टा जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate) आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक जण त्यांचे जोरदार कौतुक करत आहेत. 

व्हिडिओमध्ये आयएएस दिव्या एस अय्यर यांनी  'गोलियों की रासलीला-रामलीला' या चित्रपटातील 'नगाडा संग ढोल...'  या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. नुकतेच त्या केरळमधील महात्मा गांधी विद्यापीठाच्या (MG University, Kerala) कला महोत्सवाची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी स्टेडियममध्ये विद्यार्थी नृत्याचा सराव करत होते. ज्यामध्ये त्या देखील मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी नृत्यात सामील झाल्या आणि स्वत: ठेका धरला. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अजिन पथनमथिट्टा  (Ajin Pathanamthitta) नावाच्या युजरने फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये युजरने 'विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स मूव्हज' असे लिहिले आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर, अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये महिला आयएएसच्या डान्स मूव्ह्सचेही कौतुक केले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाKeralaकेरळ