हायकर्सच्या एका ग्रुपनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून सगळेचजण हैराण झाले आहेत. या फोटोममध्ये तुम्ही पाहू शकता काही मुलं ग्रुपमध्ये उभी आहेत. त्यांच्या हातात काचेच्या बॉटल्स आहेत. या फोटोमध्ये बॉटल्स ४ दिसत आहेत. मात्र नीट पाहिल्यास दिसून येईल हातांची संख्या तीनच आहे. चौथी बॉटल हवेत असल्याप्रमाणे भासत आहे. ही बॉटल कोणीही पकडलेली नाही. बारकाईनं निरिक्षण केल्यास समजून येईल असं का झालंय ते.
या अनोख्या गोंधळामुळे सोशल मीडियावर हजारो लोक विचारात पडले आहेत. प्रथम रेड्डीटवर फोटो शेअर केला गेला आणि नंतर एका वापरकर्त्याने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर पुन्हा पोस्ट केला ज्याने असे लिहिले आहे, "या फोटोत ४ माणसाचे हात आहेत. ही बाब माझा मेंदू मान्य करत नाही. "Sorry Love, मी तुझं जेवण खाल्लं", Uber Eats च्या डिलिव्हरी बॉयने स्वत:च संपवली ऑर्डर अन्...
ट्विटरवर शेअर केल्यानंतर या 2 लाखांहून अधिक 'लाईक्स' आणि 43,000 हून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. जेव्हा बहुतेक लोकांनी फोटोकडे बारकाईने पाहिले तेव्हा त्यांना समजले की फोटोमध्ये चौथा हात देखील आहे, ज्याने आम्हाला दिसत नसलेले जाकीट घातले आहे. सध्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट केलेले जॅकेट बाजारात उपलब्ध होतात. त्यामुळे कपडे असे घातलेत की गोंदवलं आहे. यातला फरक कळत नाही. असाच काहीसा गोंधळ हा फोटो पाहत असलेल्या प्रेक्षकाच्या मनात तयार होते. बाबो! ४ महिन्यांच्या या गायीला मिळाली २ कोटी रूपये किंमत, पण का?