शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

Viral Photo: कतरीना कैफ आणि इलेक्शन रिझल्ट, हर्ष गोएंकांनी शेअर केलं भन्नाट मीम, पाहुन पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:37 IST

नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणार गोयंका यांनीही एक मजेदार मीम शेअर केले आहे. ते पाहून यूझर्स हसल्याशिवाय राहत नाहीत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि त्याचे निकाल याची सर्वच जण प्रतीक्षा करत होते. आता भाजपाच्या बाजूने लोकांनी कल दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे युपीमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलताना दिसत आहे. येथे भाजपाचे (BJP) वादळ आहे, तर काँग्रेस (Congress) आणि बसपा (BSP) यांच्यामध्ये खालून पहिल्या क्रमांकावर येण्याची स्पर्धा आहे. या परिस्थितीवर सोशल मीडियावर तर मीम्सचा वर्षाव सुरू आहे. भाजपा, काँग्रेस, सपा, बसपा हे प्रमुख पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित मीम्स प्रचंड व्हायरल झाले आहेत. यादरम्यान प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका हेही मागे नाहीत. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणार गोयंका यांनीही एक मजेदार मीम शेअर केले आहे. ते पाहून यूझर्स हसल्याशिवाय राहत नाहीत.

उत्तर प्रदेश विधानसभा ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ओपिनियन पोलवाले तर नजर ठेवून होते. उत्तर प्रदेशात विविध ओपिनियन पोलमध्ये भिन्नता होती. कोणी सपाला तर कोणी भाजपाला झुकते माप देत होते. एक्झिट पोलचेही तेच. निकाल मात्र काय लागला, हे सर्वांसमोर आहे. त्यालाच अनुसरून गोयंका यांनी एक मीम शेअर केले आहे. कॅटरिना कैफ हिच्याशी संबंधित हे मीम आहे. या फोटोमध्ये आधी सलमान खान मग रणबीर कपून आणि शेवटी विकी कौशल दाखवण्यात आला आहे. म्हणजेच ओपिनियन आणि एक्झिट पोल कसे फेल झाले तेही त्यांनी या फोटोतून दाखवले आहे.

ट्विटरवर त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. तो आता वेगाने व्हायरल होत आहे. लोक लाइकही करत आहेत. तसेच रिट्विटही जोशात होत आहे. कमेंटमध्ये यूझर्सनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले आहे, ‘Really tremendous humour bomb’ तर आणखी एकाने म्हटले आहे, Excellent outcome… याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या मीमला दाद दिली आहे. तर काहींनी ऐश्वर्या बच्चनचा फोटो रिट्विट केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर