शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

मंडपात सप्तपदी घेणार होता नवरदेव, कॅमेराच्या फ्लॅशनं झाला त्याचा भांडाफोड; लग्न कॅन्सल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:15 IST

Viral News : नवरदेवाच्या एका गोष्टीचा भांडाफोड झाला आणि नवरीनं लग्नास नकार दिला. महत्वाची बाब म्हणजे नवरदेवाचा भांडाफोड फोटोग्राफरच्या कॅमेरामुळे झाला. 

Viral News : उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील मलई गावातील एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेहमीच लग्नात घडणाऱ्या अजब घटना समोर येत असतात. कधी भांडणं होतात, तर कधी नवरी किंवा नवरदेव पळून जातात. पण आता ज्या लग्नाची चर्चा सुरू आहे. त्यात वेगळीच भानगड झाली. इथे नवरदेवाच्या एका गोष्टीचा भांडाफोड झाला आणि नवरीनं लग्नास नकार दिला. महत्वाची बाब म्हणजे नवरदेवाचा भांडाफोड फोटोग्राफरच्या कॅमेरामुळे झाला. 

झालं असं की, नवरदेव सप्तपदी घेण्यासाठी बसला होता. तेव्हा फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी आला. त्यानं फोटो क्लिक करताच, कॅमेराचा लाइट नवरदेवाच्या डोळ्यांवर पडला आणि तेव्हाच त्याचा एक डोळा वेगळ्याच पद्धतीनं चमकू लागला. सगळ्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि नवरीनं लग्नास नकार दिला. वाद वाढला तेव्हा पोलिसांनाही बोलवण्यात आलं. 

मलई गावातील राम सेवच्या बहिणीचं लग्न निजामुद्दीनपूरच्या पिंटू गौतमचा मुलगा जगमोहनसोबत ठरलं होतं. वरात वाजतगाजज गावात आली. लग्नाचे वेगवेगळे रिवाज सुरू झाले. नवरदेव मंडपात बसला तेव्हा त्याच्या डोळ्यावर कॅमेराचा फोकस पडला आणि अचानक डोळ्यांमध्ये वेगळीच चमक दिसू लागली. ज्यामुळे वेगळीच चर्चा रंगली.

महिलांनी आपसात कुजबूज सुरू केली की, नवरदेवाचा एक डोळा वेगळा दिसत आहे. संशय वाढला तेव्हा नवरीकडील लोकांनी आणखी विचारपूस केली. मंडपातच नवरदेवाला एक डोळा बंद करून समोर बोटं किती आहेत विचारलं गेलं. तो बरोबर उत्तर देऊ शकला नाही. ज्यामुळे हे स्पष्ट झालं की, त्याचा एक डोळा नकली आहे. हे ऐकताच नवरीनं लग्नास नकार दिला.

मंडपात वाद वाढल्याचं पाहून नवरीकडील मंडळींनी पोलिसांना बोलवलं. दोन्हीकडील लोकांमध्ये रात्रभर पंचायत चालली. शेवटी नवरदेवाच्या परिवारानं नवरीच्या परिवाराला १.५ लाख रूपये तेव्हा वाद मिटला. वरात नवरीशिवायच परतली. 

दुसरीकडे नवरदेवाच्या वडिलांनी दावा केला की, मुलीकडील लोक लग्नाआधी १० वेळा मुलाला बघण्यासाठी आले होते आणि तेव्हा ते काही नाही म्हणाले. ते म्हणाले की, मुलाचा डोळा नकली नाहीये. त्याने लेन्स लावली होती. लोक या घटनेची सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. एकानं लिहिलं की, "कॅमेरानं केलेला भांडाफोड" अशी कमेंट केली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके