शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video:नाचताना इतका बेभान झाला नवरा की वधुच्या तोंडावरच मारली लाथ, नेटकऱ्यांची हसून पुरेवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 20:16 IST

सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हा व्हिडिओ भारतातला नव्हे तर परदेशातला दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यावर या कपलसाठी त्यांचं लग्न आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखं झालंय, असंच तुम्हीही म्हणाल.

सोशल मीडियावर कपलचे (Couple Video on Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यातले काही रोमँटिक (Romantic) असतात तर काही व्हिडिओ मजेशीर (Funny) असतात. एकमेकांची चेष्टामस्करी करणारे, सोबत डान्स करताना किंवा एखाद्याची फजिती करणारे व्हिडिओही आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा आपल्या पार्टनरला (Partner) इम्प्रेस करण्याच्या नादात फजिती होणारे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हा व्हिडिओ भारतातला नव्हे तर परदेशातला दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यावर या कपलसाठी त्यांचं लग्न आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखं झालंय, असंच तुम्हीही म्हणाल.

या व्हिडिओमध्ये दिसतंय की वधू (Bride) खुर्चीवर बसलेली आहे आणि नवरदेव (Groom) तिच्यासमोर डान्स करत आहे. दोघेही आपापल्या वेडिंग ड्रेसमध्ये (Wedding dress) कमालीचे सुंदर दिसत आहेत. पण त्यांचा लग्नाचा हा डान्स व्हायरल होऊन लोकांमध्ये इतका लोकप्रिय होईल, याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. मुलगी खुर्चीवर बसलेली असते आणि मुलगा समोर उभा असतो. नंतर दोघेही नाचू लागतात. एका डान्स स्टेपनुसार (Dance Step) मुलाला पाय उचलून मुलीच्या डोक्यावर न्यायला सांगितलं जातं; पण ही स्टेप फसते आणि उपस्थितांमध्ये हशा पिकतो. कारण वराने तिच्या डोक्यावरून पाय न्यायला पाय वर उचलला; पण तो जास्त उंचावरून नेता न आल्याने त्याचा पाय वधूच्या तोंडावर जोरदार आदळला आणि वधूचं डोकं खाली आपटलं. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लग्न अशा वेगळ्या पद्धतीने आठवणीत राहील, असं या कपललादेखील वाटलं नसेल, अशा प्रतिक्रिया लोक या व्हिडिओवर देत आहेत. डान्स स्टेप फसल्यामुळे वराची फजिती झाली असली आणि वधूला लागलं असलं तरी नेटकरी मात्र स्वतःचं मनोरंजन (Entertainment) करून घेताना दिसत आहेत.

या व्हिडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर, अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओवर हसणाऱ्या इमोजी (Laughing Emoji) कमेंट केल्या आहेत. काहींनी या घटनेनंतर या कपलला त्यांचं लग्न आयुष्यभर लक्षात राहील, असंही म्हटलंय. एकंदरीतच फसलेल्या डान्स स्टेपमुळे व्हायरल झालेल्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून लोक मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर