Video - नवरदेव स्टेजवर बसला होता, मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने नवरीच्या भांगेत भरलं सिंदूर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:41 PM2023-03-25T13:41:16+5:302023-03-25T13:42:42+5:30

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हायरल झालेले व्हिडीओ पाहिले असतील. असाच एक मजेदार व्हिडीओ आता समोर आला आहे.

groom kept sitting man behind put sindoor on bride then girl did- omething hilarious video | Video - नवरदेव स्टेजवर बसला होता, मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने नवरीच्या भांगेत भरलं सिंदूर अन्...

Video - नवरदेव स्टेजवर बसला होता, मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने नवरीच्या भांगेत भरलं सिंदूर अन्...

googlenewsNext

लग्नात आनंदाचं वातावरण असलं तरी कधी कधी असं काही घडतं ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आत्तापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हायरल झालेले व्हिडीओ पाहिले असतील. असाच एक मजेदार व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये वधू आणि वर स्टेजवर बसलेले पाहू शकता. मुलीचे लग्न वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी होणार आहे. लग्नाचे विधी चालू आहेत आणि लोक येत आहेत आणि जोडप्याला आशीर्वाद देत आहेत. मात्र याच दरम्यान असे काही घडते, जे पाहून तेथे उपस्थित लोक हैराण होतात. 

व्हायरल व्हिडीओ लोक यूट्यूबवर वेगवेगळ्या चॅनलवर अपलोड करत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलीचे लग्न तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषाशी होत आहे. दोघेही स्टेजवर बसले आहेत की तेवढ्यात मुलीच्या मागे उभा असलेला एक व्यक्ती मुलीच्या भांगेत सिंदूर भरतो. तो एकदा नाही तर अनेक वेळा सिंदूर भरतो. मुलाच्या या कृत्याने मुलगी सुद्धा आश्चर्यचकित होते आणि उठते आणि तिथून निघून जाते. 

व्हिडीओवर कमेंट करताना अनेक लोक लिहित आहेत की, "पप्पाची परी निघाली! ती उडून गेली." म्हणजे जेव्हा मुलगा भांगेत सिंदूर भरतो तेव्हा ती शांतपणे उठते आणि निघून जाते.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लग्नाच्या अनेक क्लिप पाहायला मिळतील, परंतु आपण ज्या क्लिपबद्दल बोलत आहोत ती 1.14 मिनिटांनी सुरू होते. 

या व्हिडिओवर लोकांच्या जबरदस्त प्रतिक्रियाही येत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, "तिचा एक्स बॉयफ्रेंड आहे असे दिसते". तर एकाने "बहिणीच्या संमतीशिवाय लग्न होत आहे" असे लिहिले आहे. तर काही लोक याला विधी देखील म्हणत आहेत. सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: groom kept sitting man behind put sindoor on bride then girl did- omething hilarious video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.