शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी शिक्षक असूनही करतात फूड डिलिव्हरीचं काम, कारण वाचून व्हाल भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:38 IST

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, शिक्षक असूनही डिलिव्हरी बॉयचं काम का करतात? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

Teacher turns Food Delivery Boy: झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या अनेक स्टोरी सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यातील काही स्टोरी खूपच प्रेरणादायक तर काही स्टोरी मनाला चटका लावणाऱ्या असतात. अशाच एका कहाणीची सध्या चर्चा होत आहे. यात एक शिक्षक डिलिव्हरी बॉयचं काम करत असल्याचं समोर आलं. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, शिक्षक असूनही डिलिव्हरी बॉयचं काम का करतात? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

कोरोना महामारीनंतर बिहारच्या भागलपूरमध्ये कुमार परिवारात आनंदाचं वातावरण होतं. कारण परिवारातील सगळ्यात मोठा मुलगा अमित कुमार याना सरकारी नोकरी लागली. आता ते सरकारी शिक्षक आहे. अमित कुमार याना पार्ट टाइम शिक्षक म्हणून नोकरी मिळाली होती. ज्यासाठी त्याना ८ हजार रूपये मिळत होते. जे घर चालवण्यासाठी कमीच होते.

पार्ट टाइम शिक्षक असूनही अमित कुमार यानी फुल टाइम काम केलं. मुलांना खेळांमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित केलं. अमित कुमार म्हणाले की, "अडीच वर्षानंतरही पगारात काही बदल झाला नाही. सरकार पात्रता परीक्षाही घेत नाहीये. शाळेतील इतर शिक्षकांना ४२ हजार रूपये पगार मिळतो. जो माझ्या पगारापेक्षा पाच पटीने जास्त आहे".

डिलिव्हरी बॉय बनण्याचं कारण

या वर्षाच्या सुरूवातीला अमित कुमार आणि दुसऱ्या पार्ट टाइम शिक्षकांना चार महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. ज्यामुळे त्यांना मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागले. जसजसी लोनची रक्कम वाढत गेली, त्यांच्या आर्थिक समस्या वाढत गेल्या.

आपल्या पत्नीच्या सल्ल्याने अमित यांनी फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोवर स्वत:ला डिलिव्हरी पर्सन म्हणून रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, "मी फूड डिलिव्हरी पर्सनच्या कामाबाबत माहिती घेतली आणि मला आढळलं की, या कामासाठी ठराविक अशी काही वेळ नसते. मी लगेच रजिस्टर केलं आणि काम सुरू केलं. मी सकाळी मुलांना शिकवतो आणि सायंकाळी ५ ते १ वाजेपर्यंत डिलिव्हरीचं दुसरं काम करतो".

आधी अमित एका खाजगी शाळेत काम करत होते. पण कोविड १९ महामारीने त्यांची नोकरी गेली. २०१९ मध्ये त्यांनी सरकारी परीक्षा दिली आणि १०० पैकी ७४ गुण मिळवले. नंतर त्यांना २०२२ मध्ये नोकरी मिळाली.

अमित म्हणाले की, "माझ्याकडे ८ हजार रूपये आहे. त्यामुळे इतक्या पैशात घर चालवणं अवघड आहे. मी स्वत:च पोट भरू शकत नाही तर घरातील लोकांचं कसं भरणार? माझ्या घरात एक आई आहे. तिची काळजी घ्यायची आहे. अशात मला दोन काम करण्याशिवाय पर्याय नव्हता".

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके