शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

“माझ्या आईचा मोबाईल परत द्या, त्यात खूप आठवणी...”; आईच्या मृत्यूनंतर ९ वर्षाच्या मुलीचं भावूक पत्र व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:46 IST

या मुलीच्या आईचं १६ मे रोजी कोविड १९ आजारामुळे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देकोडागुचे उपायुक्त, आमदार आणि जिल्हा कोविड १९ हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसाठी हे पत्र लिहिलं आहेमाझे वडील मोलमजुरी करतात. या काळात आम्ही शेजाऱ्यांच्या मदतीनं जीवन जगत आहे९ वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं. अनेक युजर्सने पोलिसांना या प्रकरणात कारवाई करण्याचं आवाहन केले

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे हाहाकार माजला आहे. कोरोनानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. लहान मुलांच्या डोक्यावरील छत्र हरपल्याने ती पोरकी झाली. कोरोनाच्या या काळात काही ठिकाणी माणुसकीला लाजवणारीही घटना घडली. एका ९ वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कर्नाटकमधील या मुलीने आईचा मोबाईल गायब झाल्याने हे पत्र लिहिलं आहे. तिच्या या पत्राची दखल घेऊन पोलिसही सक्रीय होऊन तिच्या आईचा मोबाईल शोधत आहेत.

या मुलीच्या आईचं १६ मे रोजी कोविड १९ आजारामुळे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. कुशालनगरचे रहिवासी ऋतिकने कोडागुचे उपायुक्त, आमदार आणि जिल्हा कोविड १९ हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसाठी हे पत्र लिहिलं आहे. या मुलीने पत्रात म्हटलंय की, मी, माझे आई-वडील तिघांनी कोरोना चाचणी केली होती. आईची तब्येत बिघडल्याने आम्ही तिला मदिकेरी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माझे वडील मोलमजुरी करतात. या काळात आम्ही शेजाऱ्यांच्या मदतीनं जीवन जगत आहे. १६ मे रोजी माझ्या आईचं निधन झालं. हॉस्पिटलमध्ये कोणीतरी माझ्या आईकडे असणारा मोबाईल घेतला. मी माझ्या आईला गमावलं, मी पोरकी झालीय. त्या फोनमध्ये माझ्या आईच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे ज्या कोणी हा फोन घेतला असेल त्यांनी तो या पोरक्या मुलीला परत करावा असं तिने विनवणी केली आहे.

ऋतिकचे वडील नवीन कुमार यांनी सांगितले की, माझी पत्नी टीके प्रभाने १६ मे रोजी कोरोनामुळे या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर तिच्याकडील वस्तू आम्हाला सोपवण्यात आल्या पण त्यातील मोबाईल गायब होता. तिच्या नंबरवर आम्ही कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु तो नंबर स्विच ऑफ येत आहेत. जेव्हापासून हा फोन नाही तेव्हापासून माझी मुलगी खूप रडतेय. त्या फोनमध्ये आमच्या कुटुंबातील अनेक आठवणींचे फोटो होते. व्हिडीओ आहेत. तिने आईच्या मोबाईलचा वापर करून ऑनलाईन वर्गात भाग घेतला होता. आता मी काहीच करू शकत नाही. ना तो फोन शोधू शकतो ना नवीन फोन घेण्यासाठी मी समर्थ आहे असं तिच्या वडिलांनी सांगितले.

याच दरम्यान या ९ वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं. अनेक युजर्सने पोलिसांना या प्रकरणात कारवाई करण्याचं आवाहन केले. एका ट्विटला उत्तर देताना कर्नाटकचे डीजी आणि आयजीपी प्रविण सूद म्हणाले की, आमची टीम हा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही लवकरात लवकर हा फोन शोधू असा विश्वास त्यांनी दिला आहे. त्याशिवाय कोडागु पोलिसांची टीम हॉस्पिटल प्रशासनाच्या संपर्कात आहे. सर्व प्रकारच्या सुविधांचा वापर करून हा फोन लवकर शोधू. जिल्ह्यातील अन्य पोलिसांनाही याबाबत सतर्क केले आहे. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस