ही मुलगी आहे अस्सल 'परम सुंदरी', व्हायरल व्हिडिओत पाहा क्रीती सेननही हिच्यासमोर आहे फेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 03:09 PM2021-07-30T15:09:06+5:302021-07-30T15:11:40+5:30

सध्या कीर्ती सननच्या परम सुंदरी या गाण्याची क्रेझ आहे. मग या चिमुकलीलाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही...

The girl sony dance on 'Param Sundari' song from film mimi , see in the viral video, Kriti Sanon is also in front of her! | ही मुलगी आहे अस्सल 'परम सुंदरी', व्हायरल व्हिडिओत पाहा क्रीती सेननही हिच्यासमोर आहे फेल!

ही मुलगी आहे अस्सल 'परम सुंदरी', व्हायरल व्हिडिओत पाहा क्रीती सेननही हिच्यासमोर आहे फेल!

googlenewsNext

क्रीती सेननचा मीमि हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच झळकला. यातील परम सुंदरी या गाण्यानं सर्वांना ठेका धरायला लावलंय. या गाण्यावर एका चिमुकलीने धमाकेदार डान्स केला आहे. हा डान्स सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
इस्टाग्रामवर तानिया अँड सोनी  (tania_and_sony) नावाचं अकाऊंट आहे. त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय. हे एका आईचं अन् मुलीचं अकाऊंट आहे. या अकाऊंटवर या दोघींनी अनेक गाण्यांवरील डान्सचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. सध्या क्रीती सेननच्या परम सुंदरी या गाण्याची क्रेझ आहे. मग या चिमुकलीलाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही.

तुम्ही या व्हिडिओत पाहु शकता ही चिमुकली क्रीतीच्या परम सुंदरी या गाण्यावर कशा सफाईदार मुव्हज् करतेय. क्रीतीने सिनेमातील डान्समध्ये केलेली एकन्एक स्टेप ती अचूक करतेय. तीचे एक्सप्रेशन तर इतके सॉलिड आहेत की क्रीती सेननचे एक्सप्रेशनही तिच्यासमोर फिके पडतील. 

यामुलीचं नाव सोनी असून आतापर्यंत एक लाखांहुन अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. लोक तर या मुलीचं कौतुक करता करता थांबत नाहीयेत. या व्हिडिओला ९ हजारच्या वर लाईक्स मिळाल्या आहेत. ही छोटी क्रीती सेनन लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

Web Title: The girl sony dance on 'Param Sundari' song from film mimi , see in the viral video, Kriti Sanon is also in front of her!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.