शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता हे काय नवीन? रसगुल्ल्यासोबत दही चाट, फुड ब्लॉगरने शेअर केला रडत,रडत व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 18:52 IST

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने शेव, दही आणि चटणीसोबत रसगुल्ला चाट बनवला होता. बरं, आता हे कॉम्बिनेशन ट्राय करण्यासाठी एका फूड ब्लॉगरने दुकानाला भेट दिली. इंस्टाग्रामवर तिने पहिल्यांदा टिक्की रसगुल्ला चाट चाखतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर फूडचे अनेक कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतात, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होतात. तुम्ही जर खाद्यपदार्थाचे शौकीन असाल तर आम्हांला खात्री आहे की तुम्हीही त्याबद्दल थोडेसे उत्सुक असाल, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने शेव, दही आणि चटणीसोबत रसगुल्ला चाट बनवला होता. बरं, आता हे कॉम्बिनेशन ट्राय करण्यासाठी एका फूड ब्लॉगरने दुकानाला भेट दिली. इंस्टाग्रामवर तिने पहिल्यांदा टिक्की रसगुल्ला चाट चाखतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

होय, हे वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल, पण हे खरं आहे. हा व्हिडिओ फूड ब्लॉगर अंजली धिंग्राने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि तो आतापर्यंत ८४ हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तिला हे कॉम्बिनेशन आवडले आहे का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल. काही लोक हा व्हिडिओ लाईक करत आहेत तर काही लोक विचित्र प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल व्हिडिओची सुरुवात एका फूड ब्लॉगरने रेस्टॉरंटच्या बाहेर टिक्की रसगुल्ला चाट दाखवत आहेत. तिच्या हातात चाट दिसत आहे आणि ती तो टेस्ट करते. पण तिला तो काही आवडत नाही. ते खाल्ल्यानंतर ती निराश दिसते, कारण तो विकत घेण्यासाठी तिने १४० रुपये खर्च केले. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमचे आवडते स्ट्रीट फूड कोणते आहे?’, हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर व्हायरल झाला आहे आणि नेटिझन्स व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. काही लोक रसगुल्ला चाट पाहून नाराज झाले होते, तर काही असामान्य कॉम्बो ट्राय करण्यासाठी उत्सुक होते.

फूड ब्लॉगर अंजली धिंग्रासारख्या पोस्टवर कमेंट करणाऱ्या अनेक युजर्सनी या विचित्र खाद्यपदार्थाबद्दल आपली निराशा शेअर केली. एका युजरने लिहिले, ‘मला तिच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे, कृपया अशा अस्सल मिठाईसोबत काहीही मूर्खपणा करू नका’ दुसऱ्याने लिहिले, ‘एका बंगाली व्यक्तीचे मन खूप दुखावले गेले असावे’, तिसऱ्या यूजरने लिहिलं, ‘इतका विचित्र कॉम्बो कोण ठेवतो’ व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये भरपूर इमोजी पाहायला मिळत आहेत.

 

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम