शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अजब प्यार की गजब कहानी! पतीनेच पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत लावलं लग्न, नातेवाईक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 09:54 IST

पतीने आपल्या पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडशी फिल्मी स्टाईलप्रमाणे लग्न लावून दिलं आहे. या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. पत्नीचं दुसऱ्याचं तरुणावर प्रेम जडलं. त्यानंतर पतीनेच दोघांचं लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नातेवाईकांसह सर्वच जण हैराण झाले आहेत. बिहारच्या जमुईमध्ये ही घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडशी फिल्मी स्टाईलप्रमाणे लग्न लावून दिलं आहे. या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पती विकास त्याची पत्नी शिवानी हिचं तिचा बॉयफ्रेंड सचिनसोबत लग्न लावून देताना दिसत आहे. 

1999 चा बॉलिवूड चित्रपट 'हम दिल दे चुके सनम' च्या कथेशी हे प्रकरण जोडले जात आहे, ज्यामध्ये अभिनेता अजय देवगणला त्याची पत्नी ऐश्वर्या रायचं बॉयफ्रेंड सलमान खानशी लग्न करुन द्यायचं होतं, मात्र चित्रपटात तसे होऊ शकलं नाही. व्हिडिओमध्ये विकास त्याच्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडशी स्वतःच्या इच्छेने लग्न करण्याविषयी बोलत आहे. त्याचवेळी, फोटो पाहिल्यानंतर शिवानीच्या प्रेमप्रकरणाची माहिती झाल्याचंही तो म्हणत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, शिवानीचे लग्नापूर्वी सचिनसोबत अफेअर होते. विकास हा जमुई जिल्ह्यातील सोनो पोलीस स्टेशन हद्दीतील बलथर गावचा रहिवासी आहे. 

पतीनेच पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत लावलं लग्न

शिवानी कुमारी या जमुईच्या खैरा पोलीस स्टेशन हद्दीतील दानसिंगडीह गावातील रहिवासी आहेत. विकासच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांपूर्वी त्याने शिवानीशी लग्न केलं होतं. शिवानीवर पूर्वीपासून प्रेम करणारा सचिन हा मुलगाही जमुई जिल्ह्यातील झझ पोलीस स्टेशन हद्दीतील काबर गावचा रहिवासी आहे. लग्नानंतर विकास शिवानीसोबत बंगळुरूमध्ये राहत होता. येथे तो एका खासगी कंपनीत काम करतो. एक दिवशी विकासला कळाले की शिवानी आपल्या प्रियकराला भेटते, तेव्हा त्याने दोघांनाही बसवले आणि समजावले आणि दोघांनी पुन्हा भेटायचं नाही असं सांगितलं. 

विकास आणि सचिनमध्ये अनेक भांडण आणि मारामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण तरीही शिवानीने सचिनला भेटणे थांबवलं नाही. त्यानंतर विकासनं दोघांमधील प्रेम बघून समजूदारपणा दाखवला आणि आपल्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न लावून देण्याचा विचार केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तिचा बॉयफ्रेंड शिवानीच्या डोक्यामध्ये कुंकू भरत आहे. यावेळी विकासही तेथे उपस्थित होता. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार