शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

लय भारी! बाप लेकीच्या नात्याची बातच न्यारी, मुलीचे पाय धुवून तेच दूध प्यायला, पाहा भावूक व्हिडीओ

By manali.bagul | Updated: December 9, 2020 12:33 IST

Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर व्हायरल होणारा बाप लेकीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावूक झाले आहेत.

बापलेकीच्या नात्याचे वर्णन शब्दात करणं कठीण आहे. लहानपणापासून आपल्या सोबत असलेली लेक कधीही परक्या घरी जाईल या भीतीने बापाचा जीव कसावीस होत असतो. कितीती संकट असली तरी आपल्या चेहऱ्यावरील ताण बाजूला ठेवून, चेहऱ्यावर सतत हसू ठेवत एक कठोरातील कठोर पुरुष आपल्या लेकीला सासरी पाठवताना मात्र हळवा होतो. सध्या असाच बापलेकीचा एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर होतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा  बाप लेकीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावूक झाले आहेत.

आतापर्यंत तुम्ही लहान मुलींच्या पहिल्या गृहप्रवेशाचे आणि मुलींच्या पाठवणीचे अनेक भावनिक व्हिडीओ पाहिले असतील. मात्र असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. सध्या सोशल मीडियावर बापलेकीच्या नात्याचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. 

व्हिडीओमधील या मुलीचं लग्न ठरलं आहे. लग्नाआधीच्या विधी पार पडत आहेत. त्यापैकीच हा एक विधी आहे. यामध्ये बाप आपल्या लेकीचे दुधाने पाय धुतो आहे आणि तेच दूध स्वतः पितो आहे. व्हिडीओत पाहू शकता मुलगी खुर्चीवर बसली आहे. तिच्या पायाखाली एक ताट ठेवलं आहे. तिच्या वडीलांना आधी पाण्याने तिचे पाय धुतले, त्यानंतर दुधाने पाय धुतले. तिचे पाय धुऊन जे दूध ताटात पडलं ते त्यांनी पुन्हा वाटीत जमा केलं आणि ते स्वतः प्यायले.

फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस...

वडीलांना आपले असे लाड करताना पाहून मुलीलाही अश्रू अनावर झाले.  वडील मोठ्या कौतुकाने आणि मन लावून मुलीचे पाय धुत आहेत. तिनं आपल्या वडीलांना ते दूध पिण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वडीलांनी तिचं एक ऐकलं नाही. त्यांनी तिला थांबवलं आणि ते दूध प्यायले. त्यानंतर पुन्हा तिचे पाय धुतले आणि एका पांढऱ्या कपड्यावर आपल्या लाडकीच्या पाऊलखुणा त्यांनी घेतल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकजण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भावूक झाले आहेत.  काय सांगता? व्यापाऱ्यानं ९ लाखाला घेतला करामती दिवा; खरं कळल्यानंतर डोकं आपटत बसला

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके