शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार

By manali.bagul | Updated: September 24, 2020 13:13 IST

२५ वर्षीय वैशाली या केळ्याच्या कचऱ्यापासून उत्पन्न मिळवतात. इतकंच नाही तर त्यांनी जवळवपास  हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून  दिला आहे. 

(Image Credit- New Indian Express)

कोणत्याही वस्तूंचा किंवा खाद्यपदार्थांचा कचरा आपण नेहमी फेकून देतो. पण हाच कचरा  हजारो लोकांच्या उत्पन्नाचं साधन ठरू शकतो, असा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आज आम्ही तुम्हाला कचऱ्याचा वापर करून आत्मनिर्भर झालेल्या महिलांबद्दल सांगणार आहोत. बिहारच्या हाजीपूर येथे चांगल्या दर्जाची केळी उपलब्ध असतात. या केळ्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा निर्माण  होतो. कचरा आपण नेहमी फेकून देतो कारण त्याचा काहीही उपयोग नसतो. पण  २५ वर्षीय वैशाली या केळ्याच्या कचऱ्यापासून उत्पन्न मिळवतात. इतकंच नाही तर त्यांनी जवळपास  हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून  दिला आहे. 

न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार वैशाली फॅशनशी निगडीत क्षेत्रात काम करत असल्यामुळे या कचऱ्याला ते युरोपपर्यंत पोहोचवतात. या फायबरपासून कपडे आणि इतर फॅशनेबल साहित्य तयार केले जाते. वैशाली यांनी या महिलांना फॅशनबेस्ड स्किल ट्रेनिंगसुद्धा दिलं आहे.  स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या निमित्तानं वैशाली यांनी एक प्रकल्प सुरू केला आहे. 'सुरमई बनाना एक्स्ट्रेशन प्रोजेक्ट' असं या प्रकल्पाचं नाव आहे.  वैशाली यांनी दिलेल्या माहितीनुसार याअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.  दिवसेंदिवस या प्रकल्पाअंतर्गत महिलांचा सहभाग वाढत चालला आहे. 

Video : बापरे! गाडीच्या चाकामध्ये अकडला १४ फुट लांब अजगर; पाहा 'कसा' बाहेर काढला

कपड्यांसाठी या फायबरचा उपयोग 

वैशाली यांनी दिलेल्या माहितीनुसार ''या महिलांना केळ्याच्या झाडापासून मिळत असलेल्या कच्च्या मालापासून उत्पादनं तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे.  या फायबर्सचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो. हाजीपूर येथे उत्तम दर्जाच्या केळ्यांचे उत्पादन केलं जातं हे मला लहानपणापासूनच माहिती होते.  केळ्याची पीकं काढून टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो. हाच कचरा उत्पादनं तयार करण्यासाठी फायदेशीर ठरतो.''

जिद्दीला सलाम! कॅन्सरवर मात केली; लकव्यामुळे उभं राहणं कठीण, तरीही 'बॉडी बिल्डर' बनला

अजून उत्पादन वाढवता येऊ शकतं 

मनुष्यबळाच्या साहाय्याने केळ्याचे पीक, पल्प, फायबर्स यांचे उत्पादन वाढवता येऊ शकते. डॉ. नरेंद्र कुमार हे जेष्ठ कृषी तज्ज्ञ असून त्यांनीही या महिलांना दोन दिवसांचे ट्रेनिंग दिले होते. केळ्यापासून तयार होणारा कचरा हा सगळ्यात मजबूत फायबर्सपैकी एक आहे. याचा वापर दोरी, चटई, कपडे,  हाताने तयार केलेला कागद, वुलन फॅबरिक्स तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला  जातो. 

मानलं गड्या! लॉकडाऊनमध्ये पठ्ठ्यानं बनवली भन्नाट सायकल; अन् हजारो रुपयांना होतेय विक्री

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी