Fact Check: Death of corona, will the government not get the benefit of these two schemes | Fact Check: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारच्या ‘या’ दोन योजनेचा लाभ मिळणार नाही? जाणून घ्या सत्य

Fact Check: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारच्या ‘या’ दोन योजनेचा लाभ मिळणार नाही? जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली: दिवसेंदिवस देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यात सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज व्हायरल होत असल्याचं आढळून आलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत विम्याचा लाभ मिळणार नाही अशाप्रकारचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पीआयबी फॅक्टचेकनुसार पंतप्रधान सुरक्षा बीमा योजना (PMSBY) संबंधितांना विमा मिळत नाही, परंतु पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत काही विशिष्ट अटींसह कोरोनाच्या मृत्यूचा समावेश आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) काय आहे. या मेसेजमध्ये लिहिण्यात आलंय की, जर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू कोरोना किंवा अन्य कारणास्तव झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीच्या पासबुक अकाऊंटवर १२ रुपये आणि ३३० रुपये व्यवहाराची एन्ट्री चेक करावी आणि विम्यासाठी दावा करावा.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी ३३० रुपये आणि पंतप्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी १२ रुपये वर्षाला बँक अकाऊंटमधून जातात. त्या व्यक्तींना सरकारकडून २ लाखांचा विमा सुरक्षा दिला जातो. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना ही रक्कम दिली जाईल असं मेसेजमधून सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजबद्दल सत्यता लोकांना सांगितली आहे.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) काय आहे?

भारत सरकार विविध योजनांद्वारे आपल्या नागरिकांना विमा देखील प्रदान करते. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत प्रदान केली जाते. त्यात गुंतवणूक करून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपये मिळतात. मे २०१५ रोजी ही योजना सुरू केली गेली. पॉलिसीधारकाला वार्षिक ३३० रुपये जमा करावे लागतात.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना(PMSBY) म्हणजे काय ?

या योजनेंतर्गत सरकार केवळ महिन्याला १ रुपये प्रमाणे २ लाखांचा मृत्यू विमा देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१६ मध्ये ही योजना सुरू केली होती. योजनेअंतर्गत वार्षिक १२ रुपये प्रिमियममध्ये संबंधित व्यक्तीला अनेक प्रकारचे विमा कव्हर दिले जातात. ही रक्कम आपल्या लिंक केलेल्या बँक खात्यातून दरमहा वजा केली जाते. अपघातामध्ये कायमस्वरुपी अपंगत्वासाठी २ लाख तर अंशतः अपंगत्वासाठी १ लाख रुपये दिले जातील.

पीआयबी फॅक्ट चेक म्हणजे काय?

पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या धोरणे, योजना, विभाग, मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे की खोटी आहे हे शोधण्यासाठी सरकार पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेते. पीआयबी फॅक्ट चेक वॉट्सअ‍ॅप नंबर 8799711259 वर स्क्रीनशॉट, ट्वीट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातम्यांची यूआरएल पाठवता येईल. या व्यतिरिक्त pibfactcheck@gmail.com वर ईमेलही करु शकतात.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fact Check: Death of corona, will the government not get the benefit of these two schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.